ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.991

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके गोंधळ अभंग ९९१

अकरा खणावरी मंदीर उभविलें । तेथें एक देखिलें रुपेंवीण ॥१॥ त्या न बोलत्यासि बोलावया गेलें । मीहि न बोलती झालें गे माय ॥२॥ बापरखुमादेविवरेंसि ठकचि पडिलें । मीचि ठसावलें ब्रह्माकारें ॥३॥

अर्थ:-
दहा इंद्रिये व मन अशा अकरा तत्त्वांच्या खाणीवर देहरूपी मंदीर उभे केले आहे त्या मंदीरामध्ये रूपरहित आत्मा हा देव आहे. त्याला पाहिले.त्या न बोलणाऱ्या देवासी बोलण्याचा मी प्रयत्न करू लागले. पण तो आत्मा माझेच स्वरूप असल्या मुळे मीही मुकी झाले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याच्या कृपेने मीच ब्रह्मरूप आहे असा निश्चय झाला व तोच माझ्या ठिकाणी बाणला.असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *