ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.972

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

अभंग ९७२

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके कुट अभंग ९७२

उगमेवीण पाणी वाहते सारणीं । शिंपिती माळिणी वेळोंवेळा ॥१॥ नसे माळिणीचा मळा नसे सरोवर तळे । नित्य वेळोंवेळो फुलतसे ॥२॥ ज्ञानदेव म्हणे ही खूण जाणा । षण्मास सुजाणा सूटि दिली ॥३॥

अर्थ:-
सृष्टिदृष्टीवादांतून जगताची उत्पत्ति मायेपासून झालेली आहे असा वेदांतशास्त्राचा सिद्धांत आहे. परंतु माऊली या अभंगातून या सिद्धांताचे खंडण करतात. कारण मायारुपीसरोवरांतून जगद्रूपी पाणी, अनादि प्रवाहरुपी पाटातून वाहात आहे. व कल्पनारुपी माळीण त्या पाण्याने जन्ममरणरुपी मळ्याला सिंचन करीत आहे. व तो मळा अत्यंत प्रफुल्लित झालेला आहे, असे वाटते. परंतु विचार केला तर अजातवादाच्या दृष्टिने मायारुपी सरोवर नाही. व कल्पनारुपी माळीण नाही. म्हणूनच जन्ममरणरुपी मळाही नाही. हे सूज्ञ मनुष्या तुला या कोड्याचा उलगडा करण्याविषयी सहा महिन्याची मुदत दिली आहे.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *