ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 851

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके गाईच्या रूपकाने हरीचे वर्णन अभंग ८५१

काळी कोसी कपिला धेनु रे । तिचे दुभतें काय वानूं रे । तिसी बापमाय दोन्ही नाहीं रे । ते असक्रिया वेगळी पाहें रे कान्हो ॥१॥ ती अखरींच चरे रे । सर्वसाक्षी वरती जाय रे कान्हो ॥धृ॥ पैल येकी सहस्रमुखी रे । तिहींहूनी येकी आहे रे । तिचीं नांवें अनंत पाहें रे । तिसी बापमाय कोण रे कान्हो ॥२॥ बापरखुमादेविवरी विठ्ठली पाहे रे । ते पुंडलिकाचे द्वारी जाय रे । तिचे दुभतें अपरंपार रे । तेंदुभतें सहस्रधारी रे कान्हो ॥३॥

अर्थ:-

एक काळी कपिला गाय आहे. तिचे दुभते काय वर्णन करावे?तिला आईबाप दोन्हीही नाही. (अजन्मा असल्यामुळे) आणि असक्रिया म्हणजे ती सर्वाहून वेगळी आहे. ती आपल्या अखरी म्हणजे चरणाच्या जागी चरत आहे. व ती सर्वांची साक्षी आहे. दुसरी जी एक सहस्रमुखी गाय आहे. व आणखी एक तीन गुणांच्या पलीकडची गाय निर्गुण अशी आहे. तिला अनंत नावे आहेत. तिचे आईबाप कोण आहेत सांग पाहू. ती गाय म्हणजे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हे असून पुंडलिकाचे द्वारांकडे गेलेले आहेत. तिचे दुभते अपरंपार म्हणजे हजारोधारांनी ती दूध देत आहे.असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *