ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.929

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके अंबुला अभंग ९२९

अवचित परवडी जालिये अंबुलिया । लाजिले आपुलिया सकळ गोता ॥१॥ एकांतीचे सुख भोगी आपुलिया सरिसी । दोहींची सरसी गती झाली ॥२॥ बापरखुमादेविवर विठ्ठला लाधला । मज घेउनी गेला बाईये वो ॥३॥

अर्थ:-

एक गौळण म्हणते आत्मतत्त्वरूप श्रीकृष्णाची गाठ एकाएकी पडल्यामुळे मला सर्व आप्तेष्टांची लाज वाटली. मी याच्याबरोबर एकांतात आत्मसुख भोगीत असतांना मी माझेपणाला विसरून गेले. माझे पिता व रखुमाईचा पती जे श्रीविठ्ठलरूप आत्मतत्त्वाची गाठ असल्यामुळे ते माझ्या ठिकाणचा माझेपणाच घेऊन गेले असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *