ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.751

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७५१

अनुभवें अनुभवु बोधा बोध आथिला । निःशब्दीं निःशब्द नादावला ॥१॥ माझा श्रीगुरू ब्रह्म बोलणीं बोलवीतु । तेथील संकेतु कोण्ही नेणें ॥२॥ निवृत्तिप्रसादें म्यां ब्रह्मचि जेविलें । ब्रह्म ढेंकरी पाल्हाईलें नेणोनियां ॥३॥

अर्थ:-

अनुभवाचा जो अनुभव, ज्ञानाचे ही ज्ञान, निःशब्दाचे शब्द, असलेला जो माझा श्रीगुरू निवृत्तिराय तो अशा प्रकारचा ब्रह्मस्वरूपाच्या गोष्टी सांगत आहे. या श्रीगुरूंच्या उपदेशाचे वर्म, अधिकारी, मुमुक्षुशिवाय कळणार नाही. श्रीगुरू निवृत्तिरायांच्या प्रसादाने मी सर्व जेवण ब्रह्मरसाचेच जेवलो आणि ब्रह्माचीच ढेकर देऊन तृप्त झालो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *