ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.441

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४४१

सनीळ जें ब्रह्म बिंब सत्रावीचें । विश्वरूप महाकारणी ॥१॥ ब्रह्मज्योतीचिये प्रकाशे करूनी । देखे त्रिभुवनीं एक वस्तु ॥२॥ ज्ञानदेव म्हणे ज्योतीची जे ज्योती । ब्रह्मरंधी वस्ती परमात्मयाची ॥३॥

अर्थ:-

ब्रह्मरंधातील नीलवर्ण बिंदुरूप बह्म सत्रावी नावाच्या अमृतसरोवराजवळ महाकारण देहात प्राप्त होते. त्या चैतन्याच्या प्रकाशाने सर्व जगत एक वस्तु आहे. असे ज्ञान करून घे. जगातील प्रकाशमान पदार्थांना प्रकाश देणारा जो परमात्मा तो ब्रह्मरंधात प्रगट होतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *