ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.437

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४३७

शास्त्रार्थाची वाणी निरंजनी दिसे । औटपीठी वसे निर्विकार ॥१॥ अहं सोहं मग ॐकाराचे देठीं । अहंतेचे शेवटी सोहं वस्तू ॥२॥ सोहं वस्तू निळी अहं गेलीया । आनंद झालीया महाकारणीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्तीची आण । या वेगळी खूण आणिक नाहीं ॥४॥

अर्थ:-

शास्त्रार्थानी वर्णन केलेले ब्रह्म ते औठपीठात निर्विकार स्वरूपांत दिसते. अहं सोहं असा जप ओंकाराच्या स्वरूपांत ध्याता,ध्यान व ध्येय अशा भेदाने दिसतो. पण उपाधिचा निरास केला म्हणजे शुद्ध ब्रह्मच प्रतितीला येते. अहंकाराचा विसर पडला म्हणजे याच देहात आनंदरूप तेजोमय नीलबिंद दिसतो. मी निवृत्तीनाथांची शपथ घेऊन सांगतो की या नीलबिंद शिवाय दुसरी ज्ञानप्राप्तीची खूण नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *