ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.941

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके घोंगडी  अभंग ९४१

तुझें घोंगडें ऐकची चोख । दुजे वोळख अमंगळ ॥१॥
दे धडुत न घोंगडे मोठे । खिरपटें जळो देवा ॥२॥
खुमादेविवरू उदार जाला । धडौता केला ज्ञानदेवो ॥३॥

अर्थ:-
तुझे ऐक्यबोधाचे घोंगडे फार चांगले आहे. त्या ऐक्यबोधाच्या दृष्टिने दुजेपणाचे भान अमंगळ आहे. धडुत म्हणजे ऐक्य बोधाचे हे मोठे घोंगडे आणि माझे देहात्मभावाचे खिरपटे(घाणेरडे)जळून जाऊ दे. अशी विनवणी केल्यामुळे रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याने मला धडौता केला म्हणजे परमात्मबोधरूपाने संपन्न केले. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *