ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.930

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके अंबुला अभंग ९३०

अंबुला विकुनी पवित्र झाली । पोटींची बाळें कौतुकीं मारिलीं ॥१॥ पापा वेगळी मी जाले वो नारी । विठ्ठला घरीं नांदतसे ॥२॥ आशा तृष्णा नणंदा मारिल्या । शेजारी राहविल्या संतसंगें ॥३॥ बापरखुमादेविवर विठ्ठल भोगिला । मज पैं लाधला गुणेवीण ॥४॥

अर्थ:-

एक गौळण म्हणते मी अहंकाररूपी नवऱ्याला विकून टांकून पवित्र झाले. आणि पोटातील काम क्रोधादिक जी मुले त्यांचा कौतुकाने नाश केला. विशेषण जे अंतःकरण त्याचा त्याग केल्याबरोबर मी पापावेगळी झाले. पापा वेगळी झाली म्हणून परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी आनंदाने नांदते. आशा, तृष्णा या लौकिकवृत्तीच्या नणंदा मी मारून संताच्या संगतीत राहू लागले. यामुळे निर्गुण असणारे माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल मला लाधले. त्याचे आनंदाचा भोग मी माझे ठिकाणी कांही एक गुण नसतांना भोगला असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *