ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.697

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६९७

पंचबाणें माझें हृदय भेदलें । पांचेवीण पावले चाही सांडूनियां ॥१॥ सकळे माझें गोत मुसें आलें । ब्रह्मरसें जालें बाईये वो ॥२॥ बापरखुमादेविवरू ब्रह्मरसे विवळला । मजसहित निमाला ब्रह्मरूपी गे माये ॥३॥

अर्थ:-

पंचबाणे म्हणजे शब्दादिक पाच विषयाने माझे हृदय भेदून टाकले होते. परंतु मी त्या विषयांचा व विषयासीं व्यवहार करणाऱ्या मन, बुद्धि, चित्त, अहंकार या चौघांचा त्याग करून ब्रह्मस्वरूपांच्या ठिकाणी पावलें. आतां माझे सर्व गोत त्या ब्रह्मस्वरूपांतच आले. आणि ब्रह्मरसाने मी तृप्त झाले. माझे पिता व रखुमादेवीच् पती जे श्रीविठ्ठल ते ब्रह्मरसाच्या रूपाने उदयाला येऊन माझ्या जीवपणासह वर्तमान ब्रह्मरूपात लय पावले. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *