ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.442

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४४२

महातेजा आंत बिंदु कोणे परी । उष्ण तेजा माझारीं साक्ष पाहा ॥१॥ कुंडलिनी उर्ध्वमुखें अग्नी सोडी । तयाची हे जोडी संत जना ॥२॥ ज्ञानेश्वर म्हणे आत्मा यातें जाणे । सुनिळ अनुभवणे निवृत्ति पाहा ॥३॥

अर्थ:-

ब्रह्मरंधातील तेजोमय नीलवर्ण ज्योतीतील तेजाचा कोणत्याही रीतीने अनुभव घ्या. प्राणायामाच्या योगाने योगाभ्यासी पुरूषांची कुंडलिनी नाडी जागृत होऊन ती वर तोंड करून अग्नी सोडते. व त्यामुळे संत लोकांना वरील तेजोमय ज्योतीचा अनुभव येतो. या तेजाला मी आत्मा समजतो. या ज्योतीचा अनुभव घ्यावयाचा असेल तर निवृत्तीनाथांना शरण जा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *