ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 883

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ८८३

निरंजन वना गेलिये साजणी ।
तेथें निर्गुणे माझ्या मनी वेधियेलें ॥१॥
सुखाची अति प्रीति जहाली गे ब्रह्मीं ।
श्रीगुरूनिवृत्ति मुनी जाहलें गे माय ॥२॥
बापरखुमादेविवरू विठ्ठलु सहज सांवळा ।
निर्गुण दाविला विसुरा गे माये ॥३॥

अर्थ:-

मी निरंजन वनामध्ये गेलें. तो तेथे त्या निर्गुणाने माझे मन वेधून टाकले. त्या परब्रह्मस्वरूप श्रीकृष्णाच्या ठिकाणी फार प्रेम जडले आणि तो परमात्मा श्रीगुरू निवृत्तीमुनी, मीच होऊन बसले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तो मला सहज प्राप्त झाला. आणि चमत्कार काय सांगावा तो निर्गुण मला दाखविले असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *