षडचक्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

षडचक्र

प्राणायाम ध्यान धारणा, ईश्वरभक्ती, ईत्यादी साधनांनी आपल्या देहात असणारी *कुंडलिनी* व *षड्चक्रे* जागृत होतात व ध्यानामध्ये अतिशय दिव्य अनुभव येऊ लागतात.

*मूलाधारचक्र*:- मूलाधारचक्र जागृत झाल्यावर साधकाला मूलाधारचक्रामध्ये ऐरावताचे दर्शन होते. अथवा  ॐ काराचे दर्शन होते. हे चक्र जागृत झाल्यावर साधक विद्वान बनतो. कवी बनतो गद्य-पद्याची रचना त्याच्या कडून होतात. *’गणपती’* ही या चक्राची देवता आहे.

*स्वाधिष्ठानचक्र* :- स्वाधिष्ठानचक्र जागृत झाल्यावर ध्यानामध्ये एक मोठा देवमासा समुद्रात विहार करत आहे. असे दिसते. स्वाधिष्ठानचक्राची
देवता *ब्रम्हदेव* असुन, येथे साधकांना ब्रम्हदेवाचे दर्शन घडते.

*मणिपुरचक्र* :- मणिपुरचक्र जागृत झाल्यानंतर एक मेंढा अंगावर चाल करून येत आहे. असे दिसते, मणिपुरचक्राची देवता *विष्णू* असुन, येथे साधकांना भगवान विष्णुंचे दर्शन घडते.

*अनाहतचक्र* :- अनाहतचक्र जागृत झाल्यानंतर दशविध नाद ऐकू येतात. या नादावरच नंतर अनुसंधान ठेवायचे असते. या चक्राची देवता *रूद्र (शंकर)* ही असुन, येथे साधकास साक्षात शंकराचे दर्शन घडते.

*विशुद्धचक्र* :- विशुद्धचक्र जागृत झाल्यावर आपल्या म्हणजेच स्वस्वरूपाचे दर्शन होते. या चक्राची देवता *जीवात्मा* म्हणजे आपण स्वताःच येथे आपल्याला आरशात प्रतिबिंब पाहिल्याप्रमाणे आपलेच रुप दिसते, तसेच काही लोकांना येथे निळ्या रंगाचा हत्ती दिसतो, अथवा निळा प्रकाश दिसतो.

*आज्ञाचक्र* :- आज्ञाचक्र जागृत झाल्यानंतर *अर्धनारीश्वराचे* दर्शन होते. काही साधकांना *हंसाचे* दर्शन होते. आकाशात हंस विहार करतांना दिसतो. काही साधकांना येथे अनेक देव-देवतांचीही दर्शने होतात. व महत्वाचे म्हणजे आपल्या सदगुरूंचे दर्शन होते.

*सहस्त्रारचक्र* :- सहस्त्रारचक्र जागृत झाल्यानंतर साधकाला सिद्धावस्था प्राप्त होते. साधक जीवनमुक्त सिद्धपुरुष बनतो. येथे साधकाला *परमेश्वराचे दर्शन* होते. व तो परमेश्वराशी एकरूप *(शिवरूप)* होतो.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *