बेल अर्थात बिल्वपत्र विस्तृत महत्वपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

भगवान शिव यांच्या पुजेत बेलपत्राचे विशेष महत्व आहे बेलपत्रा शिवाय शिवपुजा पुर्णत्वास जात नाही

यात्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधम् ।
त्रिजन्मपापसंहारं एकबिल्वं शवार्पणम् ।। – ( बिल्वाष्टक श्लोक १ )

अर्थ : तीन पाने असलेले बेल पत्र , त्रिगुणाप्रमाणे* (सत्वगुण,रजगुण , व तमो गुण) , तीन डोळ्यांप्रमाणे असणारे , तीन आयुधे असल्याप्रमाणे असणारे आणि तीन जन्मांची पापे नष्ट करणारे असे हे बिल्वदल मी शंकराला अर्पण करतो* . बेलाच्या झाडाला येणाऱ्या पानाना बेल पत्र असे म्हणतात, तीन पाने एकत्रित असलेले पान याला एक बेलपत्र मानले जाते, बेलाची पाने चांगली असावी तीला किड लागलेली नसावी, किवा छिद्र पडलेली नसावीत, अशी बेल पत्र शिवाला वाहिली जातात,

हे वाहताना सर्व सामान्य साधकांनी देठ समोर ठेवावे,बेल पत्र हे उपडे शिव लिंगावर ठेवावे, शिव लिंगावर पाण्याचा अभिषेक चालू ठेवावा देवाला फूल वाहताना देवाकडे ठेवतात पण जे शिवाची मारक स्वरुपाची पूजा करीत असतात ते शिवाला वहाण्यात येणारे बेल पत्राचे देठ स्वतःकडे ठेवतात कारण देठाच्या माध्यमातून मारक शिव तत्त्व प्राप्त असते एकच बेल हे पाण्यातून धुवून परत परत शिवलिंगावर वाहता येतो इतर फुलांप्रमाणे त्याचे निर्माल्य होत नाही मात्र सोमवारी वाहिलेला बेल दुसऱ्या दिवशी चालत नाही इतर दिवशी वाहिलेला बेल पण्यातुन धुवून तो दूसऱ्या *दिवशी वाहीलेला चालतो.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *