ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.953

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके घोंगडी  अभंग ९५३

तूं माझा स्वामी मी तुझा रंक । पाहतां न दिसे वेगळिक ॥१॥ मीतूंपण जाऊं दे दुरी । एकचि घोंगडे पांघरूं हरि ॥२॥ रखुमादेविवरा विठ्ठलुराया । लागेन पायां वेळोवेळां ॥३॥

अर्थ:-
हे विठोबाराया, तूं माझा स्वामी आहेस म्हणजे सेव्य आहेस. आणि मी तुझी सेवा करणारा एक दीन रंक आहे. स्वामीपणा व रंकपणा हा उपाधिदृष्टिने असला तरी जीवब्रह्मैक्यबोधाच्या दृष्टिने पाहिले तर तुझ्या माझ्या स्वरूपांमध्ये भेद मुळीच नाही. याकरिता मीतूपण हे द्वैत पलीकडे सारून ब्रह्मात्मैक्य बोधाचे एकच घोंगडे आपण पांघरू. अशा बोधाने हे रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल, तुमच्या पायाला मी वेळोवेळा लागेन. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *