ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.948

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके घोंगडी  अभंग ९४८

माझें चवाळें रंगाचें बहुतें । श्रीगुरूनिवृत्तिनाथें दिधलें गे माय ॥१॥ चवाळें शुद्ध चहूं पालवी । व्योमाकारें वेद प्रसिद्ध पांघुरवी ॥२॥ आतां पराहूनि परमेचूचें । बापरखुमादेविवरा विठ्ठला अंगीचें ॥३॥

अर्थ:-
अध्यस्त पदार्थाचे ठिकाणी अनंत चित्रविचित्रता असल्यामुळे ती चित्र विचित्रता अधिष्ठानांच्या ठिकाणी प्रतितीला येते. म्हणून अनेक रंगाचे यथार्थ स्वरूपाचे घोंगडे, मला श्रीगुरूनिवृत्तिरायांनी दिले आहे. चारी पदरांनी हे घोंगडेे, फार शुद्ध आहे. आणि आकाशाप्रमाणे व्यापक आहे. याचेच वेद प्रामुख्याने वर्णन करून जीवाकडून तेच पांघुरवितो. हे सर्वाहून श्रेष्ठ असणाऱ्या त्या रखुमाईचा वर जो श्रीविठ्ठल त्याचे अंगच आहे. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *