ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.767

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७६७

मन मारुनियां मुक्त पैं केलें । मीपण माझें नेलें हिरोनियां ॥१॥ मज लाविला चाळा लाविला चाळा । विठ्ठलुचि डोळां बैसलासे ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु लाघवी भला ॥ आपरुपीं मज केला सौरसु ॥३॥

अर्थ:-

 त्या परमात्म्याने माझ्या मनाचा निश्चय करून मला मुक्त केले. माझी देहादि पदार्थाच्या ठिकाणी असलेली मी व माझे अशी सत्यबुद्धी हिसकावून घेतली. व आपण माझ्या चित्तांत व डोळ्यांत बसून आपल्या स्वरुपाचा चाळा लावला. आणि आपल्या स्वरुपामध्ये एकरुप करुन मला सुखी केले असा हे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल लाघवी आहेत असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *