ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.674

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६७४

कापुराचे भांडे म्यां ब्रह्मरसें भरिलें । घ्राणी निमाले परिमळेसहित ॥१॥ तेथें परिमळु नाहीं स्वादु पैं नाहीं । सुख दुःख नाहीं कांहींचि नाहीं ॥२॥ रखुमादेविवरेसी ठक पडिलें कांहींच नाहीं । चौघे स्वभावें बोलताती ॥३॥

अर्थ:-

कापुरासारखे शुद्ध अंतःकरणरुपी भांडे मी ब्रह्मरसाने भरले.त्यामुळे सुंगधासह वर्तमान घ्राण त्याठिकाणी लय पावले.आतां त्याठिकाणी सुगंध, स्वाद, सुखदुःख वगैरे काही एक नाही. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, त्याचे ठिकाणी माझे चित्त गुंतल्यामुळे त्यांच्यावांचून दुसरे कांही एक उरत नाही. असे चारी वेद सहजरितीने प्रतिपादन करतात. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *