ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.655

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६५५

आदि मध्य अंत सर्वसम हरि । घटमठचारी भरला दिसे ॥१॥ देखिला गे मायें अलक्ष लक्षितां । शांति पक्षवाता समबुद्धि ॥२॥ भावबळे घन अलोट अभंग । चित्संगे भंग प्रपंचाचा ॥३॥ ज्ञानदेव बोले नित्यनामप्रेम । तेथेंचि विश्रामलहरीचा असे ॥४॥

अर्थ:-

जगताची उत्पत्ति, स्थिति व लय हरिस्वरूपात असल्यामुळे घटमठादि सर्व पदार्थामध्ये तो सर्वत्र भरलेला आहे. असे त्या अलक्ष परमात्म्याचे लक्षणाने चिंतन करित असता त्याला मी पाहिला. जसा वायु सर्वत्र व्याप्त असतो. त्याप्रमाणे बुध्दीतील संसाराची बाजु जाऊन शांति प्राप्त झाली. तो अविनाश ज्ञानस्वरूप आत्मा त्याचे ठिकाणी माझा बळकट भाव असल्यामुळे त्याचे संगतीने प्रपंचाचा नाश झाला. नामाविषयी ज्याचे अंतःकरणात नित्य प्रेम आहे. ते अंतःकरणच श्रीहरिच्या विश्रांतीची जागा आहे. त्या अंतःकरणात नित्य श्रीहरि प्रगट असतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *