ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.642

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६४२

लवण पवन जळपासाव धीर । पावन समीर रवी तया ॥१॥ तेज दीप्ती आत्मा इंद्रियां प्रकाशी । समरसुनी ग्रासी दिव्य तेजें ॥२॥ पंचक दशक तत्त्वता विचारी । एकरुपें करी ग्रास त्याचा ॥३॥ ज्ञानदेवा जप हरि आत्मा माझा । चिंतिता नील जाये तूं वेगीं ॥४॥

अर्थ:-

पहिल्या चरणांत पंचमहाभूतांचे वर्णन असून पंचमहाभूते आणि त्यांच्या सत्त्व रज तम गुणांपासून उत्पन्न झालेली दहा इंद्रिये यांच्यात व्याप्त होऊन आभासरुप आत्मा आपल्या प्रकाशाने इंद्रियादिकांना प्रकाशीत करतो. आणि आभास अधिष्ठान जो कूटस्थरुप आत्मा त्या पांचभूतांना दहा इंद्रियांना आत्मैक्य करुन ग्रासून टाकतो. परमात्मरुप श्रीहरि माझा आत्मा आहे त्या परमात्म्याचे चिंतन करण्यांत तुम्ही लाजू नका. माझ्याप्रमाणे तुम्ही चिंतन केले तर तो तुम्हांला लवकरच येऊन भेटेल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *