ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.453

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-१३ वे, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४५३.

जन्मोजन्मीच्या सायासी । विठ्ठल लाधला पुंडलिकासी ॥१॥ पूर्वी पुण्य केले वो माये । विटे लाधले या विठोबाचे पाये ॥२॥ बापरखुमादेविवरू आहे । तया तीर्था केधवा जाती पाये ॥३॥

अर्थ:-

अनेक जन्मीच्या पुण्याईमुळे मोठ्या कष्टाने पुंडलिकरायांना श्रीविठ्ठलाची प्राप्ती झाली. महान पुण्याईमुळे विटेवर श्रीविठ्ठलाचे चरण त्याला दिसले त्या पंढरी क्षेत्रास माझे पाय चालून केव्हा जातील व माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल मी केंव्हा पाहिन असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *