ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.448

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-१३ वे, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४८ .

न चलति शब्द खुंटले पैं वाद । एकतत्त्व भेद नाहीं रुपा ॥१॥ तें रूप पंढरी क्षरलें चराचरीं । माझे माझ्या घरी बिंबलेंसे ॥२॥ बापरखुमादेविवरू पुंडलिका वरू । निळियाचा आगरू पंढरीये ॥३॥

अर्थ:-

श्रीपंढरीरायाचे स्वरूपाचे यथार्थ वर्णन करण्यासाठी शब्दांचे काही चालत नाही सर्व प्रकारचे वाद खुंटून जातात. कारण या एकस्वरूप असलेल्या तत्त्वास खरे म्हणजे नामरूपाचा भेद असु शकत नाही. परंतु हेच रूप विठ्ठलाच्या रूपाने चराचरांच्या रक्षणासाठी पंडरपूरात अवतरले आहे. आणि माझ्याही अंतःकरणात तेच बिंबलेले आहे. माझा हा बाप रखुमाईचा पति श्रीविठ्ठल पुंडलिकाला वर देणारा असून निळसर रंगाचे जणू तो आगरच आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *