ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.327

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-९ वे, करुणा अभंग ३२७

परिमळाची धाव भ्रमर वोढी । तैसी तुझी गोडी लागोमज ॥ अविट गे माये विटेना । जवळी आहे परी भेटेना ॥ तृषा लागलीया जीवनाते ओढी । तैसी तुझी गोडी लागो या जीवा ॥ बापरखुमादेविवरा विठ्ठली आवडी । गोडियेसी गोडी मिळोन गेली ॥

अर्थ:-

भुंग्याला जशी सुंगंधाची ओढ असते त्या प्रमाणे तुझी आवड मला लागो. भगवंता तुझे स्वरुप अवीट असून अगदी जवळ आहे पण त्याची भेट होत नाही. तहान लागल्यामुळे जी पाण्याची तहान लागते. त्या प्रमाणे तुझी गोडी माझ्या जीवाला लागो. रखुमाईचे पती व माझे पिता श्रीविठ्ठल ह्यांची आवड मला लागल्यामुळे मी त्याच्या स्वरूपाशी एकरुप होऊन गेलो असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *