ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.384

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३८४

कोणाचें हें रूप देह हा कोणाचा । आत्माराम साचा सर्व जाणे ॥१॥ मी तूं हा विचार विवेके शोधावा । गोविंद हा घ्यावा याच देहीं ॥२॥ ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा । सहस्रदळी उगवला सूर्य जैसा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे नयनातील रूप । या नांव चित्पद तुम्ही जाणा ॥४॥

अर्थ:-

माझ्या ठिकाणी दिसणारे रूप कोणाचे. देह कोणाचा हे सर्व त्या आत्मारामाला कळते. या देहांतच राहून मी कोण, तु कोण याचा विचार करून या देहात गोविंद आहे. त्याचा शोध करू  न याच देहामध्ये त्याची प्राप्ती करून घ्यावी. तो परमात्मा ध्येय, ध्याता, व ध्यान या त्रिपुटीहन वेगळा असुन जणू काही सहस्रदळा किरणांनी सुर्यच प्रकाशित झाला आहे. नेत्रात दिसणारे रुप ते चित्सस्वरुपच आहे असे तुम्ही जाणुन घ्या. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *