१ कलियुगात काय काय होणार, माणसाचा स्वभाव, आचरण, मर्यादा, व मुक्ती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
जन्मदि.१९ ९५ रोजी ५००,९५ वर्षापृवी
पत्नी अलक्ष्मी, अवदसा
छंद,  समाजाला दुषित करणे.
काय खातो,  सत्याला खाऊन टाकतो
काय पितो, लोकाचे (गरीब) रक्त पितो
विरोधदेवाचे नावाशी आणि चांगल्या लोकाशी
आयुष्य४ लाख २६ हाजार ५ वर्षे
एकूण आयुष्य  ४ लाख ३२ हाजार
भाऊ व त्याचे नाव_ काम, क्रोध, लोभ,हे तीन आहे
बहिणी आशा, दुर्बुद्धी
मीत्र खोटे, अन्याय, जुलूम, बळजबरी,
संकल्प  ५ व्या वर्षी मुलीला नवरा मागायला लावनार .
दहाव्या वर्षी मुलीला गर्भवती करणार.
 मुलाला मात्यापित्याचे वैरी करणार. 
पतीव्रेतेला कलंक लावणार
 साधू  गुरूला छळणार .

१. पुत्र तो होईल पित्याचा वैरी ।
2. भ्रतारा सोडोनी घरोघरीं फिरतील नारी ।
३. पृथ्वीमध्यें दादा एका विपरीत होईल ।
४. बहीण भावां दोघाजणांचा विवाह लागेल ।
५. पांचा वरुषांची बाळा भ्रतार मागेल ।
६. सहा वरुषांची नारी गर्भिण होईल॥६॥

कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे?
एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- ” कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल ? “
या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,” कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो.
” असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली.


सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले.
जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे.
या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले.
भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या.
एका विहरीभोवती चार विहीरी होत्या.
चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे.
पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती.
हे पाहून भीम चक्रावून गेला.
नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे.
जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली.
पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते.
खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले.


तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते.
हे पाहून नकूल गोंधळून गेला.
सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली.
ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली.
यावेळी सहदेवही चकीत झाला.
या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला.
श्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला.
” कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती.


कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील.
श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही.
कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले.
कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले.”
🙏दंडवत प्रणाम🙏
” जसे कर्म, तसे फळ.”
*” कितीही विरोध होऊदेत, चांगल्या व योग्य गोष्टींनाच आपला पाठींबा द्या.

वाचा सविस्तरपणे

संत एकनाथ
निर्गुण निराकार दादा माहूर माझें


निर्गुण निराकार दादा माहूर माझें गांव ।
शंकुन सांगावया आले यमाई माझें नाव ।
तये नगरीं वस्ती केली मी तरी आलें एकभावें ।
ऐसा माझा शकुन दादा चित्त देऊन ऐकावें॥१॥

कैकाय कैकाय बाबा दुरील माझा देश ।
शकुन सांगावया मी आलें कलियुगास ।
ब्रह्याविष्णु महेश पुसती शकुन आम्हांस ।
ऐसें निदान आम्हीं सांगितलें त्यास ॥२॥

धरित्री आकाश मज देखतां उप्तत्ती ।
चंद्र सुर्य दादा मज देखतां होतीं ।
ब्रह्याविष्णुमहेश मज देखतां उपजती ।
जेथें आहे शिव तेथें आदि शक्ती ॥३॥

दाही अवतार मज देखतां झाले ।
अकराही रुद्र दादा होऊनियां गेले ।
अठ्ठयाशीं सहस्त्र ऋषी मज देखतां जन्मले ।
ब्रह्मादि तेहतीस कोटी खेळविले ॥४॥


अठ्ठावीस युगें झाली चक्रवर्ती ।
कौरव पांडव गेले दादा नेणों किती ।
छ्प्पन्न कोटी यादव गेले दादा कोणी पंथीं ।
आम्ही तुम्ही जाऊं मागें कोणी न राहाती ॥५॥


पृथ्वीमध्यें दादा एका विपरीत होईल ।
बहीण भावां दोघाजणांचा विवाह लागेल ।
पांचा वरुषांची बाळा भ्रतार मागेल ।
सहा वरुषांची नारी गर्भिण होईल॥६॥


आणिक एक दादा माझा ऐकावा बोल ।
पृथ्वीवरती वारा थोर झुंजाट सुटेल ।
थोर थोर दादा पर्वत उडोनि जातील ।
अठराही जाती एके ठिकाणीं जेवतील ॥७॥


कलियुगाची दादा ऐकावी थोर ।
पुत्र तो होईल पित्याचा वैरी ।
भ्रतारा सोडोनी घरोघरीं फिरतील नारी ।
ऐसा माझा शकुन दादा ऐका निर्धारी ॥८॥


आणिक एक दादा माझे ऐका उत्तर ।
आकार जाईल अवघा होईल निराकार ।
जाती चंद्र सूर्य मग पडेल अंध:कार ।
धरित्री आकाश जाईल मग कैंचा दिनकर ॥९॥


आणिक एक शकुन माझा ऐकावा संतीं ।
तुम्ही मूळ पिठीं राहणें नाव माझें आदिशक्ती ।
अबेंचा व्यवहार त्राहे त्राहे आदिमूर्ति ।
एका जनार्दनीं प्रसन्न झाली आदिशक्ती ॥१०॥

अवघ्या वाटा झाल्या क्षीण
अवघ्या वाटा झाल्या क्षीण । कली न घडे साधन ।
उचित विधी विधान । न कळे न घडे सर्वथा ॥१॥
भक्तिपंथ बहु सोपा । पुण्य नागवे या पापा ।
येणॆं जाणॆं खेपा । येणेचि एके खंडती ॥२॥
उभारोनि बाहे । विठो पालवीत आहे ।
दासां मीचि साहे । मुखें बोले आपुल्या ॥३॥
भाविक विश्‍वासी । पार उतारिलें त्यासी ।

कृत त्रेता द्वापार कली
कृत त्रेता द्वापार कली । ऐसा चौयुगांचा मेळी ।
तें महायुग शब्द आढळी । वेदांत शास्त्री ॥१॥
ऐसा ब्रह्मयाचा दिनांतर । तैसीच रात्र एक सहस्त्र ।

तिसा दिवसांचा प्रखर । एक मास ॥२॥
ऐसें बारामास । त्याचे एक वरुष ।
शतभरी आयुष्य । ब्रह्मयाचे ॥३॥
ऐसा ब्रह्मयाचा दिनांत । शत वरुषं गणित ।
ज्या प्रळयी पोहत । मार्कंडेय उदकीं ॥४॥
ऐसी अठ्ठाविस युगे जाण । पंढरपूरासी झाली पूर्ण ।
जो की ब्रह्मयाचा दिन । प्रळय काळ ॥५॥
नामा म्हणे पंढरीची संख्या । सांगितली संत महंत लोकां ।
लसूनि पादुका । विठोबाच्या ॥६॥

गावंढे सहस्त्रब्राह्मण । तृप्त केलिया भोजन ।\


गावंढे सहस्त्रब्राह्मण । तृप्त केलिया भोजन ।
पुण्य क्षेत्रीचा एकचि जाण । सुकृत तितुकेचि जोडे ॥१॥

ऐसे पुण्यक्षेत्रीचे दशशतक । तृप्त केलिया पाठक ।
पाहातां सुकृत । तितुकेचि जोडे ॥२॥

ऐसे सहस्त्रवेदपाठक । तृप्त केलिया पंडित एक ।
पहांता सुकृत । तितुकेचि जोडे ॥३॥


तैसेचि पंडित सहस्त्र एक । तृप्त केलिया संन्यासी देख ।
तरी ते सुकृत । तितुकेचि जोडे ॥४॥

तैसे सहस्त्र संन्यासी । गणित एक परमहंसी ।
पाहतां सुकृतांसी । एक तृप्त केलिया ॥५॥
परमहंसी सहस्त्रगणी । तैसीच ब्रह्माज्ञानाची मांडणी ।
जोडे सुकृत तृप्त करणी । एक ब्रह्मवेत्ता ॥६॥

उपमा देता ब्रह्मवेत्यासी । पाहता ब्रह्माडीं नाही त्यासी ।
तृप्त केलिया ब्रह्मवेत्यासी । हरिहर तृप्त ॥७॥
ऐसे वेत्ते अपरंपार । न ये नामधारका बरोबर ।
नामधारका सादर । पाहे एका जनार्दनी ॥८॥

नये नामधारका बरोबर‬‬‬‬
नामधारकाचे किती महत्व असते ते नाथबाबा आपल्याला सांगतात.
१) खेड़ेगावाकडील एक हजार ब्राम्हण यांस तृप्त भोजन दिल्याचे जे सुकृत्य पुण्यक्षेत्रीच्या एका ब्राम्हणास घडते.
२)पुण्यक्षेत्रीचे असे दश शतक ब्राम्हण तृप्त केल्यास एका पाठकाचे सुकृत घडते.
३) असे हजार वेद पाठक तृप्त केल्यास एक पंडित तृप्त केल्याचे सुकृत घडते.
४) तसे सहस्र पंडित भोजन तृप्त केल्यास एक संन्यासी तृप्त केल्याचे सुकृत घडते.
५) तैसे हजार सन्यासी त्यांची गणती एका परमहंस तृप्त केल्याचे सुकृत घडते.


६) परमहंस हजार गणले तर एका ब्रम्हज्ञानाची मांडणी होते.त्यांस एक ब्रम्हवेत्ता तृप्त केल्याचे सुकृत घडते.
७) उपमा ब्रम्हवेत्त्याची देता ब्रम्हांडात असा नाही पण त्यांस तृप्त केलेत तर भगवान हरिहर देखील तृप्त होतात.
८) ऐसे अपरंपार वेत्ते । नये नामधारका बरोबर । नामधारका सादर । पाहे एकाजनार्दनी ॥
असा नामधारकांचा महिमा आहे नाथबाबांनी किती अगणित पुण्यलाभ होईल असे यातून सांगितले आहे मग आपणही तसे नाम घ्यायला नामधारक व्हायला काही हरकत नाही.
श्रावनातील पुण्यकाळ आणि चातुर्मास देखील अगदी दुग्धशर्करा योग आहे.
नाथबाबा हे देखील सांगतात.
*अष्टादश पुराणे सांगती बडिवार । नाम साराचे सार कलीयुगी ॥ *

गोविंद गोपाळ वाचेसी निखळ
गोविंद गोपाळ वाचेसी निखळ । तो उद्धरे तात्काळ कलीमाजी ॥१॥
नारायण नारायण हेंचि पारायण । उद्धरले जन इहलोकीं ॥२॥
तुटती यातना कर्माच्या भावना । जडजीव उद्धारणा नाम स्मरा ॥३॥
नामा म्हणे राम हा जप परम । न लगती नेम नाना कोटी ॥४॥

उपदेश सुगम आइके रे एक
उपदेश सुगम आइके रे एक । नाम हें सम्यक विठ्ठलाचें ॥१॥
जनीं जनार्दन भावचि संपन्न । विठ्ठल उद्धरण कलीमाजीं ॥२॥
साधेल निधान पुरेल मनोरथ । नामेंचि कृतार्थ होसी जनी ॥३॥
नामा म्हणे नाम घेई तूं झडकरी । पावशी निर्धारीं वैकुंठपद ॥४॥

प्रपंच रचना निळोबा भोगूनि
प्रपंच रचना सर्व ही भोगूनि त्यागिली ।
अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली ।
वैराग्याची निष्ठा प्रगटूनी दाखविली ।
अहंता ममता दवडूनी निजशांती वरिली ॥१॥
जयजयजी स्वामी सद गुरु तुकया दातारा ।
तारक तू सकळांचा जिवलग सोयरा ॥ धृ ॥

हरीभक्तीचा महिमा विशेष वाढविला ।
विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडीला ।
जगदोद्धारालागी उपाय सुचविला ।
निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला ॥२॥

तेरा दिवस वह्या रक्षूनीया उदकी ।
कोरड्याची काढूनी दाखविल्या शेखी ।
अपार कविता शक्ति मिरवूनी विधी अंकी ।
कीर्तनश्रवणे तुमच्या तरिजे जन लोकी ॥३॥


बाळवेष घेवूनी श्रीहरी भेटला । विधीचा जनिता तूचि आठव हा दिधला ।
तेणे ब्रह्मानंदे प्रेमा रूढविला । न तुके म्हणूनी तुका नामे गौरविला ॥४॥

प्रयाणकाळी देवें विमान पाठविले । कलीच्या काळामाजी अद्भूत वर्तले ।
मानव देह घेऊनी निजधामा गेले । निळा म्हणे सकळ संता तोषविले ॥५॥

कलियुग वंशावली
संकलक
: धनंजय महाराज मोरे  


कुरु वंश – महाभारत पर्यान्त वंशावली
2 ब्रहाद्रथ वंश
3 मगध वंश
4 नन्द वंश


कुरु वंश – महाभारत पर्यान्त वंशावली
परीक्षित २ |हर्णदेव | रामदेव | व्यासदेव * द्रौनदेव
सिंहदेव | गोपालदेव | विजयनन्द | सुखदेव | रामन्देव
सन्धिमन् | मरहन्देव | चन्द्रदेव | आनन्ददेव | द्रुपददेव
हर्नामदेव | सुल्कन्देव |

जनमेजय ३ | शतानीक १ | अश्वमेधदत्त
अधिसीमकृष्ण | निचक्षु | उष्ण | चित्ररथ | शुचिद्रथ
वृष्णिमत् | सुषेण | सुनीथ | रुच | नृचक्षुस्
सुखीबल | परिप्लव | सुनय | मेधाविन् | नृपञ्जय | ध्रुव, मधु|तिग्म्ज्योती
बृहद्रथ | वसुदान |शत्निक (बुद्ध कालीन )|
उदयन | अहेनर | निरमित्र (खान्दपनी ) |क्षेमक

ब्रहाद्रथ वंश
यह वंश मगध में स्थापित था।
सोमाधि | श्रुतश्रव | अयुतायु | निरमित्र | सुकृत्त
बृहत्कर्मन् | सेनाजित् | विभु | शुचि
क्षेम | सुव्रत | निवृति | त्रिनेत्र | महासेन
सुमति | अचल | सुनेत्र | सत्यजित् | वीरजित् | अरिञ्जय

मगध वंश
क्षेमधर्म ६३९-६०३
क्षेमजित् ६०३-५७९
बिम्बसार ५७९-५५१
अजात्शत्रु ५५१-५२४
दर्शक ५२४-५००
उदायि ५००-४६७
शिशुनाग ४६७-४४४
काकवर्ण ४४४-४२४ ई.पू.

नन्द वंश
उग्रसेन ४२४-४०४
पण्डुक ४०४-३९४
पण्डुगति ३९४-३८४
भूतपाल ३८४-३७२
राष्ट्रपाल ३७२-३६०
देवानन्द ३६०-३४८
यज्ञभङ्ग ३४८-३४२
मौर्यानन्द ३४२-३३६
महानन्द ३३६-३२४

कलियुग वंशावली पुराणों पर आधारित विभिन्न राजाओं की वंशावली है। यहां यह वंशावली मौर्य वंश तक की दी जायेगी। यह भारत के इतिहास को प्राचीन वंशावली, जो द्वापर के अन्त तक ही सीमित थी, से आगे महाभारत के युग के पश्चात के काल में ले आती है।

कलियुग लक्षणे
माहात्म्य-अध्याय १ला (२८-३६)

हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ हा चार युगांत विभागलेला आहे. त्यातील चौथा भाग म्हणजे कलि युग. चैत्र शुद्ध प्रतिपदा, प्रमादी नाम संवत्सर, मंगळवार दिनांक २२ जानेवारी इ.स.पु. -३१०१ ला कलियुगाला सुरुवात झाली.

नवीन युगाची कल्पनाच
वैश्विक संदर्भात काळ हा चक्राकार मानला गेलेला आहे. या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मन्वंतर कल्पना. पहिल्या महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा ४३,२०,००० मानवी वर्षे इतका आहे. दुसऱ्या कल्पनेत चौदा मन्वंतरे येतात. प्रत्येक दोन मन्वंतरांमध्ये मोठे मध्यंतर असते. प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी विश्वाची पुनर्निर्मिती होते आणि त्यावर एक मनू (आदिपुरूष) अधिराज्य करतो. सध्या आपण चौदापैकी ८ व्या मन्वंतरात आहोत. प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे येतात. प्रत्येक महायुग हे चार युगात (कालखंडात) विभागले जाते. सध्याची ही चार युगे म्हणजे कृत, त्रेता, द्वापार आणि कली. या युगात अनुक्रमे ४८००, ३६००, २४०० आणि १२०० वर्षे येतात. मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी ३६० ने गुणावे लागते. यापैकी आपण सध्या चौथ्या म्हणजे कलीयुगात आहोत आणि याचा प्रारंभ इ.स.पू. ३१०२ मध्ये झाला असे मानले जाते.[१]

कलियुग लक्षणे
नारद म्हणाले पृथ्वी सर्वोत्तम आहे, असे समजून मी येथे आलो. पृथ्वीवरील पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंगम, रामेश्वरम (सेतुबंध) इत्यादी अनेक तीर्थक्षेत्री मी संचार केला. परंतु मला कोठेही मनःशांती प्राप्ती झाली नाही. सध्या अधर्माला साहाय्य करणाऱ्या कलियुगाने सर्व पृथ्वी दुःखित झाली आहे. येथे आता सत्य, तप, पावित्र्य, दया, दान राहिलेले नाही. मनुष्यप्राणी केवळ उपजीविकेत व्यग्र आहेत. ते असत्य भाषण करणारे, आळशी, मंदबुद्धी, भाग्यहीन आणि उपद्रवग्रस्त झालेले आहेत. संत म्हणविणारे दांभिक आहेत, वरकरणी विरक्त दिसणारे संचय करीत आहेत. घराघरात स्त्रियांची सत्ता चालते. पत्‍नीचा भाऊ सल्लागार झाला आहे. लोक धनलोभाने कन्याविक्रय करू लागले आहेत आणि नवरा-बायकोमध्ये कलह होत आहे. महात्मा पुरुषांचे आश्रम, तीर्थक्षेत्रे, नद्या इत्यादींवर परधर्मीयांचा अधिकार आहे. येथे दुष्टांनी बरीचशी देवालये नष्ट केली आहेत. यावेळी इथे कोणी योगी नाही, सिद्धपुरुष नाही, ज्ञानी नाही की सत्कर्म करणारा नाही. सर्व पुण्य साधने यावेळी कलिरूपी वणव्याने भस्मसात करून टाकली आहेत. या कलियुगात बहुतेक देशवासी बाजारात अन्न विकू लागले आहेत. ब्राह्मण द्रव्य घेऊन वेद शिकवीत आहेत आणि स्त्रिया सदाचारहीन झाल्या आहेत. (२८-३६)

संदर्भ

श्रीमद् भागवत महापुराण

श्रीमद्भागवत महात्म्य (पहिले )प्रारंभ


संकलक :
धनंजय महाराज मोरे
9422938199
9823334438
Email : more.dd819@dd819

कलीयुग माहात्म्य

कलीयुग माहात्म्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *