दृष्टांत 25 देवाचे गणित, समजण्यात आपण अज्ञानी आहोत.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

🌸 देवाचे गणित 🌸
🌸 एकदा दोघेजण एका मंदिराबाहेर बसून गप्पा मारत होते. अंधार पडू लागला होता आणि ढग जमा होऊ लागले होते.
🌸 थोड्या वेळाने तेथे आणखी एक माणूस आला आणि तोही त्या दोघांबरोबर बसून गप्पा मारू लागला.
🌸 थोड्या वेळाने तो माणूस म्हणाला त्याला खूप भूक लागली आहे, त्या दोघांनाही भूक लागायला लागली होती.
🌸 पहिला माणूस म्हणाला माझ्याकडे ३ भाकर्‍या आहेत, दुसरा म्हणाला माझ्याकडे ५ भाकर्‍या आहेत, आपण तिघे मिळून वाटून घेऊ आणि खाऊ.
🌸 आता प्रश्न आला कि ८ (३+५) भाकर्‍या तिघांमध्ये कशा वाटायच्या ?
🌸 पहिल्या माणसाने सुचविले कि प्रत्येक भाकरीचे ३ तुकडे करुया, अर्थात ८ भाकर्‍यांचे २४ (८ x ३) तुकडे होतील आणि आपल्या तिघात ८ – ८ तुकडे समसमान वाटले जातील.


🌸 बाकी दोघांना त्याचे मत पटले आणि ८ भाकर्‍यांचे २४ तुकडे करुन प्रत्येकाने ८ – ८ तुकडे खाऊन भूक शांत केली आणि मग पावसामुळे मंदिराच्या आवारातच ते सारे झोपी गेले.
🌸 सकाळी उठल्यावर तिसर्‍या माणसाने पहिल्या दोघांचेही आभार मानले आणि भाकरीच्या ८ तुकड्यांबद्दल प्रेमाची भेट म्हणून त्या दोघांना ८ सुवर्णमुद्रा देऊन तो आपल्या घरी गेला.
🌸 तो गेल्यावर दुसरा माणूस पहिल्या माणसाला म्हणाला की आपण दोघे ४ – ४ मुद्रा वाटून घेऊ.
🌸 पहिल्या माणसाने याला नकार दिला आणि म्हणाला की माझ्या ३ भाकर्‍या होत्या आणि तुमच्या ५ भाकर्‍या होत्या, म्हणून मी ३ मुद्रा घेईन आणि तुम्ही ५ मुद्रा घेतल्या पाहिजेत.


🌸 यावर दोघांची वादावादी चालू झाली. यातून समाधानकारक मार्ग काढण्यासाठी ते दोघे मंदिराच्या पुजार्‍याकडे गेले आणि त्यांनी आपली समस्या सांगितली व ती सोडविण्याची प्रार्थना केली.
🌸 हे दोघेही दुसर्‍याला जास्ती देण्यासाठी भांडत आहेत हे पाहून पुजारीपण चक्रावून गेला.
🌸 त्याने त्या दोघांना सांगितले की या मुद्रा माझ्यापाशी ठेवून जा आणि मला विचार करायला वेळ द्या, मी उद्या सकाळी उत्तर देऊ शकेन.
🌸 पुजार्‍याला खरेतर दुसऱ्या माणसाने सांगितलेली ३ – ५ ची वाटणी ठीक वाटत होती, पण तरीसुद्धा तो खोलवर विचार करीत होता.
🌸 विचार करता करता त्याला गाढ झोप लागली.


🌸 थोड्या वेळात त्याच्या स्वप्नात देव प्रगट झाला, तेव्हा पुजार्‍याने देवाला सर्व घटना सांगितली आणि सुयोग्य मार्गदर्शन मिळावे अशी प्रार्थना केली.
🌸 माझ्या दृष्टीने ३ – ५ अशी वाटणीच उचित आहे असेही त्याने देवाला सांगितले.
🌸 देवाने स्मित करुन म्हटले….. “नाही, पहिल्या माणसाला १ मुद्रा मिळाली पाहिजे आणि दुसऱ्या माणसाला ७ मुद्रा मिळाल्या पाहिजेत.”
🚩 देवाचे म्हणणे ऐकून पुजारी चकीत झाला आणि त्याने आश्चर्याने विचारले….. “प्रभू, असं कसं ?”


🚩 देव पुन्हा एकदा हसला आणि म्हणाला….. “यात काही शंका नाही की पहिल्या माणसाने आपल्या ३ भाकर्‍यांचे ९ तुकडे केले, परंतु त्या ९ पैकी त्याने फक्त १ वाटला आणि ८ तुकडे स्वतः खाल्ले. म्हणजेच त्याचा त्याग भाकरीचा फक्त १ तुकडा एव्हढाच होता. म्हणून तो फक्त १ मुद्रेचा हक्कदार आहे.” “दुसऱ्या माणसाने आपल्या ५ भाकर्‍यांचे १५ तुकडे केले, ज्यातले त्याने स्वतः ८ तुकडे खाल्ले आणि ७ तुकडे वाटून दिले.” “म्हणून न्यायधर्मानुसार तो ७ मुद्रांचा हक्कदार आहे…..” “हेच माझे गणित आहे आणि हाच माझा न्याय आहे.”

💎 गोष्टीचे तात्पर्य :
🌸 आपली परिस्थितीकडे बघण्याची, ती समजण्याची दृष्टी आणि ईश्वराचा दृष्टीकोन हे एकदम भिन्न असतात.
🚩 आपण ईश्वराची न्यायलीला जाणण्यात, समजण्यात अज्ञानी आहोत.
🚩 आपण आपल्या त्यागाचे गुणगान करतो, परंतु ईश्वर आपल्या त्यागाची तुलना आपले भोग आणि कर्म याच्याशी करून यथोचित निर्णय घेत असतो.
🚩 हे महत्त्वाचे नाही कि आपण किती श्रीमंत आहोत, महत्त्वाचे हे आहे कि आपल्या सेवाभावी कार्यात त्याग किती आहे. साभार…..🙏

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 13

दृष्टांत सूची पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇