१४ पितामहः भीष्म

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! भीष्म !!! भाग -१४.

इंद्रप्रस्थास नारदाचं पुनः आगमन झाले. त्यांच परत येणं हेच महान कृतीला प्रशस्तीपत्र होते. एकांतात युधीष्ठीराशी चर्चा करतांना म्हणाले ही चर्चा “कच्विप्रश्न” म्हणुन अमर होईल. तु कुरुनंदन भीष्माप्रमाणे धर्मशील, विदुराप्रमाणे नितिसंपन्न धर्मराज होशील. पितृलोकात पांडुराजाला भेटले असतां त्यांना हरिश्चंद्राप्रमाणे मोक्ष मिळण्यासाठी तु राजसुययज्ञ करावा ही इच्छा प्रगट केली.

राजसूय यज्ञाच्या इच्छेने त्यांना कृष्णाची तिव्रतेने आठवण झाली. दुसर्‍याच दिवशी कृष्ण इंद्रप्रस्थास आला. दोघांच्या चर्चेतुन राजसूय यज्ञापुर्वी नरमेध करणार्‍या जरासंधाला यमसदनी पाठवल्याशिवाय यज्ञ बेगडी ठरेल. हा यज्ञ असा व्हावा की, पृथ्वीवरच सर्व सार्वमत, आदराने न मागता सत्ताधीशांच्या देणग्या ससन्मान याव्यात. सर्व नृपतींचे सीमाप्रश्न सुटण्यासाठी जरासंधाचा संघ नामशेष झाला पाहिजे. त्यासाठी तीनच लोक त्याला मारु शकतात कृष्ण, भीष्म आणि अर्जुन !

भीष्माला कळले की, मगधच्या अजिंक्य नगरीत कृष्ण, भीम आणि अर्जुन शिरुन भीमाकरवी अहोरात्र तेरा दिवस द्वंद करुन जरासंधाचा वध झाला. भीष्मांच्या नेत्रात पांडवांबद्दल अभिमान दिसु लागला. जरासंधाला संपवणं अशक्य होतं. त्यांना पांडवांच कौतुक करावसं वाटत होत पण भावना आवराव्या लागल्या. पांडव तरी समजुन घेतील पण धृतराष्टाचा गैरसमज होईल. या राज्याचा महामंत्री असुनही राजसिंहाच्या अनुमती शिवाय कांही करु शकत नव्हते. पांडवांच्या दिग्विजयाच्या वार्ता येत राहिल्या.

यज्ञ हे श्रेष्ठ व धनिकांचं स्नेहसंम्मेलनच ! यज्ञ वैदिकांचा प्राण आहे. यज्ञ हा विश्वकल्याणासाठी असतो, पण धृतराष्टाचा यज्ञ म्हणजे धगधगता यज्ञकुंड !

इंद्रप्रस्थामधे राजसूय यज्ञासाठी देशोदेशीचे राजे तसेच भीष्मासह कुरुपरिवार येऊन पोहचला. भीष्मांनी यज्ञातील कामाची विभागणी करुन प्रत्येकाला कामाची जबाबदारी सोपवली. संपुर्ण कार्यक्रमाकडे लक्ष ठेवण्याचं उत्तरदायीत्व भीष्माकडे आलं. मयसभेतील चकवाचकवीचा आनंद सर्वजण घेत होते. मयसभेत दुर्योधनाच्या झालेल्या फजीतिला द्रौपदी हसल्याने त्याला फार अपमानकारक वाटले.

भीष्म सभेला उद्देशुन बोलु लागले, श्रेष्ठतेला सीमा असतात ! या सीमेपलीकडे एक पुरुषोत्तम आहे ! त्यांच्या सारखा युध्दनिपुण, दुरदर्शी, कल्पक, ज्ञानी आणि विनम्र, सामाजिक क्रांतीवीर, राजश्री असा ज्याने कंस वधला, ज्यानं नरकासुराच्या बंदीशाळेतुन सोळा सहस्र कुमारीकांना सोडवलं, ज्याच्या बुध्दीचातुर्याने जरासंध संपला, धर्म आणि व्यवहारांत जो निपुण आहे अशा *श्रीकृष्णाला* प्रथम पाद्यपुजा आणि अतिथी सत्कार करुन त्याला अग्रपुजेचा मान दिला. यावर शिशुपालाने हरकत घेऊन श्रीकृष्णाची निंदा नालस्ती आरंभली. शेवटी त्याचे १०० अपराध झाल्यावर श्रीकृष्णाने सुदर्शनचक्र सोडुन त्याचा वध केला. हा धर्मयुध्दाचा शंखनाद होता.

क्रमशः

संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *