!!! भीष्म !!! भाग -१३ .
गुप्तहेर शंभुकरांशी बोलतांना भीष्म म्हणाले व्यासांचे वेद अफाट आहेत. वेदांच्या शाखा आणि शाखा प्रमुखांची व्रतनिष्ठा तपासणं हे कठीणकर्म कार्य करीत आहेत. नवीन आश्रम तसंच शिष्यांमधे इर्षा येऊ न देणं ही वेगळी परीक्षा आहे. तरीही व्यास पांडवांसाठी वेळ काढतात. नक्कीच त्या वैराग्यशील पुरुषाचा कांही हेतु असावा. अन्यथा श्रीकृष्णही पांडवांच्या विवाहास आला नसता ! यदुवीरांचं पाठबळ आणि बलरामाचा अनुग्रह त्यांना आणायचा होता त्यामुळे व्यास आणि कृष्णाच्या कार्यतर्काला अनुसरुन निर्णय घ्यावे लागतील. व्यास जगद्मान्य ऋषी आणि श्रीकृष्ण विमुक्त पुरुष ! त्याला धर्माचीही बंधन नाहीत. भीष्म म्हणाले, “मी अशा संघर्षात आहे की, प्रचलीत धर्माचा त्यागही करु शकत नाही !”
स्वयंवरातील सर्व राजांचे प्रयत्न फसल्यावर ब्राम्हण वेशातील अर्जुनाने मत्स्यभेद करुन पणात द्रौपदीला जिंकुन घरी आणले. भिक्षा आणली आहे असे बाहेरुन मातेला सांगीतल्यावर कुंतीने न पाहतां आतुनच सर्वानी समान वाटुन घेण्याचा आदेश दिला. व्यासांच्या आज्ञेने द्रौपदीचा विवाह पांच पांडवांशी झाला. पांडव द्रौपदी, कुंतीसह हस्तीनापुरकडे निघाले.
पांचालदेशी याज्ञसेनी द्रौपदीचे स्वयंवर होते. देशोदेशीचे राजे, तसेच कौरव सैन्यदलासह आले. स्वयंवराच्या दिवशी सभामंडपात योग्यतेनुसार सर्वांनी आसन ग्रहण केले. दृपदाचा जेष्ठ पुत्र शिखंडी जो पुर्वजन्मीची अंबा, तीने तप साधनेने भीष्माचा प्रतिशोध घेण्यासाठी दृपदाकडे जन्म घेतला, तो अस्वस्थपणे आतुरतेने भीष्माची प्रतिक्षा करीत होता. दुष्टद्युमने अस्वस्थेतेचे कारण विचारल्यावर तो म्हणाला, “ही प्रतिशोधाची माला जन्मजन्मांतरीची आहे.”
दुर्योधन कसंही करुन पांडवांचा काटा काढायचा तर कर्णाचं धोरण सरळ युध्द करणे, याला धृतराष्टाचा पाठींबा आणि गुरु द्रोण आणि भीष्मांचा कडाडुन विरोध असेल ! यावर उपाय म्हणजे राज्याची वाटणी. राज्य युधीष्ठीराचं आहे. पण एकाच घरांत भाऊबंदकीपेक्षा विभागणी बरी. प्रश्न धर्माचा नाही न्यायाचा आहे आणि या कृतीला अनुमोदन असेल तर कृष्ण इथे निश्चीतच येईल.
पांडवांसह कुंती हस्तीनापुरला प्रवेशल्यावर त्यांचे स्वागत झाले. कलह नको म्हणुन अर्ध राज्य खांडववनाचा परिसर दिला. व्यासांसारख्या त्रिकालदर्शी पुरुषाच्या मार्गदर्शनाखाली युधीष्ठराकरवी अतृप्त आत्मे तृप्त व्हावे म्हणुन तर्पन, श्राध्द आणि महालय विधि करवुन घेतले. नागलोकांनीही मांडलेला उच्छाद नष्ट व्हावा म्हणुन होम हवन केले. त्यानंतर तीथे इंद्रप्रस्थ नांवाची नगरी बसवली. बाजार पेठा, उद्योग धंदे सुरु केले. अलौकीक मयसभा बांधली.
नारद भेटीला आले असतां त्यांनी युधीष्ठीराला म्हणाले, “पर्यटन केल्याशिवाय विविध राजवंशाच्या राज्यातुन गेल्याशिवाय माहिती होत नाही. तिर्थस्थळीची दानकर्म करण्याचे निमित्य करुन मुमुक्षांना तिर्थस्थळी न्यायला हवं !” त्यांनी पांचही भावांना द्रौपदीशी एकांताचे नियम बांधुन दिले. त्यात चुक झाल्यास १२ वर्षे तिर्थयात्रेला जायचे. ध्यानीमनी नसतांना अर्जुनला शिक्षा म्हणुन तिर्थयात्रेला जावे लागले.
विदुर भीष्मांना म्हणाले हा घडुन आणलेला प्रकार कृष्णाशिवाय कोण करणार ? या बारा वर्षाच्या काळात अर्जुनांचे तीन विवाह झालेत. बभ्रुवाहन नावाचा पुत्र लाभला.
इंद्रप्रस्थ ही पांडवांची कर्मभुमी पण श्रीकृष्णाच्या विश्वराज्याच्या नियोजनांचे ते अधिष्ठान होतं !
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६
