!!! भीष्म !!! भाग -२३.
आठव्या दिवशी भीष्मांनी महाव्यूह आणि पांडवांनी श्रृंगाठक व्युह रचला. भीमाने अत्यंत निकराने भीष्मांचा सारथी वधल्यामुळे त्यांचा रथ अनियंयत्रीत होऊन एकटे पडले. अल्पवेळेतच भीमाने आठ धार्तराष्टांचा बळी घेतले. भीष्मांनी रथ पांडवव्यूहावर घातला. अर्जुनपुत्र इरावन कामी आला. शिखंडी भीष्मांना शोधत फिरत होता. भीमाने आणखी सात धार्तराष्टांना यमसदनी पाठवले. खरं म्हणजे भीष्मांना या सर्वाचा वीट आला पण कर्तव्य सोडायचं नव्हतं !
नवव्या दिवशी भीष्मांनी सर्वतोभद्र आणि पांडवांनी अनामिक व्यूह रचला. मध्यांनीपर्यंत भीष्मांनी पांडवांचे चौदा सहस्र वीर वधले. कृष्णाने अर्जुनाला चेतवुन रथ भीष्माकडे वळवला. पण भीष्मांच्या शरजालांनी अर्जुनाचा मार्ग बंद केला. भीष्मामधे क्रुध्द यमधर्म द्रुगोच्चर होत होता.
शेवटी कृष्णाला शस्र हाती घ्यायला भीष्मांनी भाग पाडले. प्रतिज्ञेस धाब्यावर ठेवुन चाबुक घेऊन येणारा महास्रांचा महामेरु भीष्म पाहत होते. नकळत त्यांचे हात जुळले, आणि प्रार्थना करु लागले, “हे पुंडराक्षा ! येरे !ये! वंदितो तुज मी ये रे! ये! हे परमश्रेष्ठा ! ये! महारणी ! ओढुन आण ! निजवी या धाणी ! हे निर्मलदेवा! वधावे मज या रणी! धन्य होऊ दे! असेन तुझा मी ञृणी! हे गोविंद! तव कृतीनं होईन किर्तिवंत ! ये! वधावे मज निष्कलंक ! दास तुझा ! “
अर्जुनाने कृष्णाला शांतवत पुनः रथारुढ केल्यावर भीष्मांनी पुनश्च शरसंधान साधुन रणतांडव माजवुन पांडवांची अपरिमीत हानी केली.
युधीष्ठीर अत्यंत विकल होऊन कृष्णला म्हणाले, “भीष्म दुर्जेय आहेत, जो धर्म्य आहे असा” भीष्मवधाचा उपाय शोधण्यासाठी त्यांच्या मृत्युचा मार्ग त्यांनाच विचारावे म्हणुन पांडवासह कृष्ण त्यांच्या निवासाकडे निघाले. त्यांच्या राहुटीत पोहोचल्यावर युधीष्ठीराने मृत्युरहस्य विचारले असतां भीष्म म्हणाले, “हाती शस्र असतांना मी अपराजीत आहे. कालच्या किंवा आजच्या स्रीवर शस्र चालवणार नाही, असा दृपदपुत्र शिखंडी समोर आल्यास प्रतिकार करणार नाही. त्यानंतर तुमचा विजय निश्चित आहे.”
दहाव्या दिवशी भीष्मांनी व्यूह रचला. पांडवसेनेच्या अग्रभागी शिखंडी होता. घणघोर युध्द होऊन त्या दिवशीचे युध्द समाप्त झालं.
अकराव्या दिवशी भीष्मांंच्या कचाट्यात बरीचशी पांडवसेना फस्त झाली. संधी साधुन शिखंडीने तीन लांब बाण भीष्मांच्या उरांत मारलेत पण त्यांनी प्रतिकार केला नाही. भीष्मांनी अस्रशक्तीचं स्मरण करुन पांडव सैन्यात हाःहाकार माजवला. दिवस सरता सरत नव्हता. भीष्मबाणांची आग वाढत होती. शरवर्षावा बरोबर इतर शस्रांचाही सढळ वापर करीत होते. शिखंडी कुठुन कुठुन रथ पुढे दामटवत त्यांना बाण मारत होता. भीष्माच आजचं रौद्ररुप सेनापतीच्या कर्तव्याचं समर्ण करीत होते. दुर्योधन विचार करीत होता, पितामह रणभूमीतुन हटले तर त्याच जीवन आणि विजय दोन्ही संकटात सापडतील.
अर्जनाचे बाण शिखंडीच्या मागुन येणारे बाण ते परतवीत होते. भीष्म द्युष्टद्युम्नावर शरसंधान करीत असतांनाच अर्जुनाने त्यांच धनुष्य छेदलं. त्यांच्या हातातील सर्व शस्रे तो भेदीत होता. धर्युध्दाच्या सूची पायदळी तुडवल्या जात होत्या.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६
