१२ पितामहः भीष्म

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! भीष्म !!! भाग -१२.

दुर्यौधन आणि भीम एकाच दिवशी जन्मास आलेत. घटका आणि ग्रह भिन्न होत्या. दोघांच्या पत्रिकेत एकमेकांच्या ग्रहांचं खडाष्टक होत ! इकडे कुंतीपुत्र व माद्रीपुत्र एकोप्याने खेळत बागडत मोठे होत होते. एका वयोवृध्द योग्याने अलौकीक ग्रहयोजनेवर पांचही पांडु पुत्रांना वेददिक्षा दिली. शेवटी व्हायचं तेच घडलं. कामविकाराने किंदम ऋषीच्या शापाने पांडु इहलोक सोडुन गेले. माद्री सती गेली. कुंतीने सर्व प्रसंग संयमाने घेतला. पांचही पुत्रांना व अस्थी घेऊन हस्तीनापुरला परतली. सोबत ते वयोवृध्द योगी व त्यांचे शिष्यगणही होते, त्यांनी सर्व पांडवाचं यथार्थ वर्णन केलं. त्यांनी सपिंडी व पितृयज्ञाची आज्ञा केली. ते योगी कारण देहाने आलेले किंदमऋषी होते. पांडु-माद्रीचा अंत्यसंस्कार उरकला.

एका शुभदिनी भगवान व्यासांचं आगमण झालंं. दुर्वासांची सेवाव्रती बालिका, कर्णाची असहाय्य माता, पांडुची सुशील महाराणी, माद्रीची स्नेहशील जेष्ठ भगीनी, पांडुला संयमीत ठेवणारी दक्षा, आपली मंत्रशक्ती माद्रीला बहाल करणारी त्यागी, वैध्यवाचं कठोर पालन करणारी, हिमालय ते हस्तीनापुर पर्यतचा मार्ग सहज चालणारी आणि पांडु माद्रीला और्ध्वदेहिक झाल्यावर भीष्माकडे पाहुन टाहो फोडणार्‍या कुंतीच्या भेटीला तीच्या दालनात आलेत. तीचे पांच पुत्र तिथे होते. व्यासांनी सर्वांचं भविष्य एकाच दृष्टीक्षेपात वाचुन सांगीतले, तुमच्यासाठी संघर्ष हा मंत्र आहे.

व्यास भीष्मांच्या कक्षेत प्रविष्टले. कृष्णाने घेतलेल्या अवताराबद्दल आणि कर्णाचे जन्म रहस्य व्यासांनी भीष्मांना सांगुन हे रहस्य गुप्त ठेवून वर्तमान बुध्दीने कार्य करण्यास सांगीतले. दोघांची तत्वज्ञान चर्चा सुरु असतांना ते म्हणाले सत्यवतीकडुन अनेक चुका झाल्यावरही तीला सन्मानाने सांभाळुन धर्माचरणाची काळजी घेऊन पुण्यशील कार्य करवुन घेतलेत. येणारा काळ परीक्षेचा आणि लज्जा आणणारा असेल. धृतराष्ट आणि त्याच्या पुत्रांची अंध महत्वकांक्षा पोखरुन टाकले. हे चित्र सत्यवतीने पाहू नये म्हणुन तीने आता वनात जावं हे सुचविण्यासाठी आलो आहे.

सत्यवती अंबा, अंबालिकासह वनात जाण्यासाठी धृतराष्टाची आज्ञा घेऊन अत्यंत रुक्षतेने बाहेर पडल्या. काही दिवसांनी १०६ राजकुमांरांचे यज्ञोपवीत संस्कार धारणाचा कार्यक्रम झाला. पांडव, भीष्म ब्राह्मणाबरोबर आरोह-अवरोहसह वेदोच्चार ऐकुन सर्वजण थक्क झाले.

कुरु युवराज मोठे होत होते, त्यांचा आडदांडपना वाढला होता. दुर्योधनाच्या मनात द्वेषभावना जागृत होत होती. मुलं अस्र, शस्र, दिव्यास्र विद्या शिकू लागले.

एकदा मुलं विटी दांडुचा खेळ खेळत असतां विटी कोरड्या विहिरीत पडली. खेळाचा रंगभंग झाल्यामुळे मुलांची विरस झाला, एवढ्यात धवलवस्रधारी छातीवर यज्ञोपवीत रुळत असलेले एक जेष्ठ समोर आले आणि स्वतःची अंगठी पण विहिरीत टाकली. काटक्यांची रज्जु तयार करुन विहिरीतुन विटी व अंगठी अलगद बाहेर काढली.

ही घटना भीष्मांना कळल्यावर ते द्रोणाचार्य असल्याचे जाणले. त्यांना सन्मानाने प्रासादात आणले. राजपुत्रांना अनुग्रहित करण्यासाठी सर्वश्रेष्ठ शस्र विद्यापीठाची स्थापना करण्याचे आयोजन केले.

क्रमशः

संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading