
!!! भीष्म !!! भाग -२५.
भीष्म विकलांग अवस्थेत शरशय्येवर पडले होते. सर्व आप्त-स्वकीयांचा झालेला संहार पाहुन ते अतिशय दुःखी झालेत. त्यांच्यासमोर सर्व कुरुसम्राज्य नष्ट झालेले पाहुन अतिशय विकल झालेत. महात्मा भीष्म, आदर्श पित्रृभक्त, सत्यप्रतिज्ञ आणि वीर होते. एवढेच नव्हे तर महान ज्ञाते, धर्म आणि इश्वराच्या तत्वाला जाणणारे महान भगवद् भक्त होते. त्यांच्या जाण्याने जगातील ज्ञान लुप्त होईल. जे संदेहग्रस्त विषय आहे त्याचे समाधान दुसरं कोणी करुच शकत नाही. श्रीकृष्णाच्या प्रेरणेने भीष्मांनी युधीष्ठीराला वर्णाश्रम, राजधर्म, आपद् धर्म, मोक्षधर्म, श्राध्दधर्म, दानधर्म, स्रीधर्म अशा अनेक विषयांवर उपदेश केला.
युधीष्ठीराला जे विष्णुसहस्र नाम ऐकवले त्यावरुन त्यांची भगवद भक्ती आणि भागवत तत्वाचे ज्ञान दिसुन येते. त्यांच्या भक्तीमुळे साक्षात भगवान कृष्णांनी दर्शन देऊन कृतार्थ केले. अशाप्रकारे भक्ती, ज्ञान, सदाचार इ. कोनातुन आदर्श भीष्मचरित्र्य दिसुन येते.
भगवान श्रीकृष्णांचे महात्म्य आणि प्रभावाचे ज्ञान जसे भीष्मांना होते तसे फार कमी लोकांना होते. त्यांनी धृतराष्ट आणि दुर्योधनाला अनेकदा श्रीकृष्ण महिमा ऐकवला, राजसूय यज्ञाच्या वेळी कृष्णाला सर्वोत्तम ठरवून अग्रपुजेचा मान दिला. अर्जूनरक्षणासाठी कृष्ण जेव्हा रथचक्र घेऊन धावला तेव्हा भगवंताच्या हातुन मृत्यु येण्यात गौरव मानुन शस्राद्वारे पुजा करुन आवाहन केले.
भीष्मांच्या तोडीचा महापुरुष जगात विरळच! जरी भीष्म निपुत्रीक होते तरी त्रेवर्णिक हिंदु अजुनही पितरांचे तर्पन करतांना त्यांना सुध्दा पाणी देतात. असा गौरव भारताच्या इतिहासात कुणालाच मिळाला नाही. म्हणुनच आजही सगळं जग त्यांना पितामह म्हणतात. भीष्म निपुत्रिक असुनही भल्या भल्या पुत्रवंतांनि इर्षा वाटते.
भीष्मांनी सहस्रनामावली उच्चारायला सुरुवात केली. सर्व मंत्रमुग्ध झाले. स्वर-मंडलात देवी शारदा वीणा झंकारत असावी असे वाटत होते. स्वतेजाने तळपणारा दिनमणी उत्तरेकडे वळला. उत्तरायण सुरु झाले. त्यांची वायुदेवावर नजर स्थीर करुन अनुज्ञा मागीतली. श्रीकृष्णामधे परशुराम विसावले ! त्याचं रुप अलौकीक सुंदर दिसु लागले. मधुनच ते रुप विष्णुरुपातलं चतुर्भुज दिसु लागले. भीष्म कुरुकुलातले श्रेष्ठ पुरुष, आजपर्यंत सदाचरण, सद्वर्तनाने वागुन धर्माचरण केले. वास्तविक अष्टवसुंपेकी एक वसू अल्पायुषीच, पण उद्याच्या समाजाला आदर्श देण्यासाठु दिर्घायुषी ठरुन त्यांनु त्यांची जबाबदारी यथायोग्य पार पाडली.
भीष्मांच प्राणतत्व त्यांच्या सप्तचक्रात खोळंबत होतं आणि पुढे सरकत होतं. सगळ शरीर निःशर झालं ! ब्रम्हरंघ्रातुन उल्का बाहेर पडावु तसं तेज बाहेर पडल्याचं सर्वांनि जाणवलं. शेवटच्या क्षणु त्यांच्या मुखातुन ” *वासुदेवाय नमः* !” उद्ग्गार बाहेर पडला. सर्व संपलं. घराघरातल्या चुली पुनः विझल्यात.
*समाप्त*
संकलन – मिनाक्षी देशमुख.
भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६
