!!! भीष्म !!! भाग -१७.
युधीष्ठीरांना युध्द टाळायचे असल्याने अविस्थल, वृकस्थल, माकंदी, वारणावत आणि पांचवं जे देतील ते अश्या पांच गावांची मागणी केली. पण दुर्योधनाने सुईच्या अग्रावर मावेल एवढीही जागा देण्याचे नाकारले. निर्धनता म्हणजे मृत्यु ! द्रव्यहिनताला नातीबांधव आणि स्नेही सुध्दा सोडुन जातात! यापेक्षा क्लेशदायक अवस्था ती कोणती ? धन म्हणजेच श्रेष्ठ धर्म! असा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही.
धर्म प्राप्त करण्याच्या कर्मानं धार्तराष्टांना मारुन मिळवलेले धन नकोय ! क्षात्रधर्मच मुर्तिमंत पाप आहे. क्षत्रीयच दुसर्यांना मारुन वित्त कमावतो. सर्वांना मारुन मिळालेला विजयाचा काय आनंद ? म्हणुन युध्द नको असे कृष्णाला युधीष्ठीर परोपरीने सांगत होते. कृष्ण त्यांना म्हणाला, गेली दोन शतकं योजना सुरु आहे. भीष्मांचा जन्म त्यासाठीच झाला. श्रीरामाच्यापुर्वी मांडव्य ऋषींनी यमदेंना दिलेल्या शापामुळे विदुरांचा जन्म झाला. दुर्वासांची तपश्चर्या तेवढीच पुरातन आहे. आम्ही नर नारायण अनादु आहोत. पार्थ नर आहे तर कर्ण या यंत्रणेचा एक भाग आहे. कुठलही ममत्व न ठेवतां आपापलं कर्म करावं !
युध्द आतां निश्चित होणारं ! युध्द करणं स्वकर्म आहे, न केल्यास अधर्म होईल भीष्मांनी शंभुकरणलाळ युध्दभुमीत सतत सोबत राहण्याची आज्ञा केली. त्याला प्रतिकारात्मक अस्र आणि कवच दिल्यामुळे महायुध्दात निर्भयतेने फीरु शकेल. कृष्ण-कर्णाची आणि कुंती-कर्णाची भेट झाल्याचे कळल्यावर भीष्म स्तब्ध झाले.
युध्दावर जाण्यापुर्वी भीष्मांनी शंभुकरच्या वंशजासाठी त्याला कळु न देता अमाप धन पाठवले. त्यांनी सर्व चीजवस्तु वाटुन टाकल्या. कक्षातील भिंतीवर फक्त श्रीगुरु परशुरामांची मुर्ति व तेवणारा दीप सोडुन कांहीच शिल्लक नव्हतं.
युध्दभूमीवर जातांना इच्छामरणु भीष्मांनी अश्रू ढाळले आणि आसक्तीचं रसायण वाहु दिलं. थोड्या वेळाने दुर्योधन सर्व राजांसह भीष्मांच्या दर्शनाला आले. भीष्म कुरुक्षेत्राचं रेखाचित्र काढुन दिशा, वायुची दिशा, सुर्योदयाचे-सुर्यास्ताची वेव, तपमान, वर्षा होण्याची संभावना, रणक्षेत्रावर कोणता व्युह कुठे, कसा योग्य होईल याची टिपणं काढीत होते.
दुर्योधनाने त्यांची स्तुती केल्यावर ते म्हणाले, “पांडव आणि धार्तराष्ट दोन्हीही सारखेच. या पृथ्वीतलावर भीष्मासारखा अस्रज्ञ फक्त अर्जुन आहे, त्यामुळे जीथे मी असेल तीथे तो व्रतेने अस्र, शस्र टाकणार नाही” हे ऐकुन सर्वजण तनावमुक्त झाले.
भीष्मांनी दोन अटींवर सेनापतीपद स्विकारले. पहिलं म्हणजे पांडुपुत्र, पौत्रांना वधणार नाही पण माझ्या तडाख्यानी त्यांची फळी फुटेल! दुसरं म्हणजे मी सेनापती असेपर्यत कर्ण सेनेत नसेल ! भीष्मांच्या बोलण्याने दिग्मुढ झालेल्या दुर्योधनाची सुटका कर्णाने केली. पितामह थोर योध्दा आहेत. त्यांच्यानंतर पांडवांचा पडाव मी करीन. दुर्योधनाच्या भात्यात अकरा अक्षौणी शर ,भीष्म द्रोणादु महाअस्र आणि राखीव दिव्यास्र कर्ण आहेत.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६
