२४ पितामहः भीष्म

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! भीष्म !!! भाग -२४.

अर्जुनाचे गांडीव धनुष्यातले आणि इंद्रवज्राचे बाण भीष्मांच्या शरीरात घुसले. तो जर महाबली कृष्णासोबत व पांडुपुत्र नसते तर केव्हाच संपले असते. असे म्हणत थोर थोर जीवात्मे आणि वसुदेवताही आले.

वसु भीष्मांना म्हणाले, “आता युध्दातुन मन काढुन टाका” भीष्मांच्या रथातील शस्र संपली. शंभुकरनने खडःग देण्याचा प्रयत्न करताच अर्जुनाच्या बाणांनी त्याला जखडुन टाकले. शिखंडी मात्र विक्राळ हसत होता. अर्जुनाच्या बाणांनी भीष्मांच्या अंगावर बोटभरही जागा शिल्लक ठेवली नाही! कोसळता कोसळता पुर्वेकडे मुख केल्यामुळे भूमीचा स्पर्श न होता बाणांच्या शरशय्येवर निजले! ते इच्छामरणी असल्याने दक्षिणायण असल्याने प्राण रोखुन धरला.

भीष्मानी महोपनिषदात सांगीतलेल्या योगमार्गाचा अवलंब केला. असह्य वेदना असुनही औषधचिकित्सा नाकारली. मान लटकत होती म्हणुन अर्जुनाने नतपर्व बाण सोडुन त्यांच्या मस्तकाला आधार दिला. उत्तरायणापर्यंत जीवित राहणार होते. त्यांना तहान लागली म्हटल्यावर अर्जुनाने भात्यातुन एक तेजस्वी बाण काढुन पर्जन्यास्राने अभिमंत्रीत करुन जमीनीत मारल्याबरोबर पृथ्वीतुन दिव्य जलाची धार सरळ त्यांच्या तोंडात पडल्याने अमृतमय पाणी पिऊन भीष्म तृप्त झाले. नंतर त्यांनी अन्न-जलाचा त्याग केला. जेवढे दिवस जिवंत होते तितके दिवस असह्य शरपिडेसहित तहान भूकेच्या वेदनाही सोशीत वीरतेसोबत धैर्य आणि सहनशक्तीची पराकाष्ठा केली.

सर्वीकडे निस्तब्धता झाल्यावर शंभुकरणने कर्ण येत असल्याचे सांगीतल्यावर एकांताची आज्ञा केली. कर्णानं भीष्माच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि आर्द स्वरात म्हणाला, “हे पितामह माझेकडुन आपल्यासारख्या लोकोत्तर पुरुषाचा अनेकवेळा अवमान झाला. उदार मनाने क्षमा करुन आज्ञा द्यावी.”

ते म्हणाले, “तुझं जन्मरहस्य नारद आणि व्यासांनी फार पुर्वीच सांगीतले होते, त्यांनी त्याला युध्दापासुन परावृत्त करायचा प्रयत्न केला परंतु मैत्रीशी द्रोह करु शकत नाही म्हणुन नम्रपणे नकार दिला. त्यांनी धर्माला अनूसरुन युध्द करावे असा आशिर्वाद दिला.”

अकराव्या दिवशी द्रोणाचार्य सेनापती झाले. पंधराव्या दिवशी कुटनितीने त्यांचा मृत्यु झाला. सोळाव्या दिवशी कर्ण सेनापती झाल्यावर सतराव्या दिवशी त्याचाही वध झाला. अठराव्या दिवशी रात्री अश्र्वत्थामाने पांच पांडव सोडुन सर्वांचा निर्घुण वध केला. हे ऐकुण भीष्म फार व्यथीत झाले, त्यांना ग्लानी आली.

श्रीकृष्ण त्यांना भेटीस आला असतां भीष्मांनी विचारले, “माधवा ! या जन्मी तर कोणतेही अनुचित, वाईट कर्म केले नसतांना सुध्दा ह्या शरयातना का ?”

त्यावर कृष्ण म्हणाले, “मागच्या जन्मी अचानक एक नाग रस्त्यात आला असतां मागुन येणार्‍या सैन्याकडुन कुचलुन जाऊं नये म्हणुन त्याला उचलुन फेकल्यावर तो काटेरु झुडपावर पडला, त्याला झालेल्या यातना झाल्यात, आता तुम्हाला पुर्नजन्म नसल्यामुळे पुर्ण मोक्ष मिळावा म्हणुन, कर्म कोणत्याही उद्देशाने असो, भोग भोगुन द्यावेच लागतात.”

क्रमशः

संकलन-मिनाक्षी देशमुख

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading