२१ पितामहः भीष्म

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! भीष्म !!! भाग -२१.

तिसर्‍या दिवशी भीष्मांनी गरुड व्यूह रचला. चोचीच्या जागी ते स्वतः उभे राहिले. त्यांना शह देण्यासाठी पांडवांनी अर्धचंद्राकार उभं केलं. संकुलयुध्द सुरु झालं. त्यात दुर्योधन शिरल्यावर घटोत्कचानं त्याला मुर्च्छीत केलं. कौरवांची पळापळ सुरु झाली. दुर्योधन शुध्दीवर आल्यावर भीष्मांची कानउघाडणी केल्यामुळे ते पेटुन उठले. अग्नित कृमीकिटक पडावेत त्याप्रमाणे पांडवसेनेचं होऊ लागले. भीष्माच्या अतुलनीय शस्रकौशल्याने कृष्ण सुध्दा स्तंभीत झाला ! भीष्मांचा मृत्यु म्हणुन जन्मास आलेला शिखंडी बघ्याची भूमिका घेऊन पाहत उभा होता.

अर्जूनाचा रथ आलेला पाहुन त्यांनी बाणांनी रथ झाकुन टाकला. त्यांनी अपार शरसंधान करुन अर्जुनासह कृष्णालाही विध्द केलं. अर्जुन त्यांचे बाण फक्त परतवत होता. भीष्म श्रीकृष्णाला “मी हाती शस्र धरणार नाही” ही प्रतिज्ञा सारखी आठवण देत होती. पांडवसेनेची वाताहत होत होती. अर्जुनावर इतर योध्देही तुटुन पडले ! उद्वेगाने कृष्णाने अश्वरश्मी हवेत झीडकारुन तीथे पडलेल्या भग्न रथाचे चक्र हाती घेऊन भीष्मांच्या दिशेने धावला. भीष्म धनुष्य ताणुन नेत्रपल्ल हलतात त्याहीपेक्षा वेगाने शरसंधान करीत होते, या योध्याला वृध्द म्हणावं का ?

श्रीकृष्ण भीष्मांकडे येतांना पाहुन त्यांनी धनुष्य खाली ठेवलं. हस्तप्रक्षालन आणि आचमण घेऊन नेत्रपल्लव ओले केले नी हात जुळवत खड्या स्वरात म्हणाले, “ये, ये जगन्निवासा ! माधवा !! हे चक्रपाणे ! मजकडे ये ये ! हा मी वंदितो तुज लोकपाणे !! हे शरण्या ! करुणा करा !!” भीष्मांच्या आर्त स्वरांनी सर्व स्तब्ध व थक्क होऊन अलौकीक दृष्य पाहत होते.

द्रोण, विकर्ण, सोमदत्त आणि कृतकर्म्याला आक्रमण करणार्‍या उग्र कृष्णाच्या नेत्रात आकाशाचा नीलीमा गडद झालेला दिसत होता. भीष्मांच हे वेडं रुप पांडव वीरांना सम्रभरात टाकुं लागल ! आणि भीष्म ! रथावरुन अत्यंत निर्भयतेने पण विनयानं म्हनत होते __ “ये ये !! नरसिंह देवा ! वामणदेवा !! ये ! ये! परशूरामा ! रेणुकानंदनि !! ये ! ये! श्रीरामा ! दशरथनंदना !! ये ! ये! यादवेंद्रा ! गोविंदा ! कृपावंता ! ओढी मज या भूमीवर ! निर्दाली मज क्षणात आज ! मी असेन धन्य जर वधशील मज ! तीनही भुवनीचा मी किर्तिवंत !!!”

अर्जुनाने श्रीकृष्णाला कसंबसं शांत केले. सर्व युध्दकामार्य रथारुढ झालेत. अर्जूनाने महेंद्रास्राचा प्रयोग करुन कौरवसेनेची दाणादाण उडवुन दिली. अर्जुनाने महेंद्रास्राने नामोहरण केल्यानं त्यांच्यातल्या विजिगीष्ट योध्याला पचनी पडेना !

चवथ्या दिवशी भीष्मांनी तुंबळ युध्ध सुरु केले. भीष्म आणि अर्जुनचे द्वैरथ युध्द सुरु झाले. दोघेही घात प्रतिघात करुन शस्रकौशल्य दाखवु लागले. भीष्मांना पांडवांना मारायचं नव्हतं आणि कौरवसेनाही घटवायची नव्हती. म्हणुन सुर्यास्तापुर्वीच युध्द समाप्तीचा शंख फुंकला !

क्रमशः

संकलन-मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading