!!! भीष्म !!! भाग -१६.
पांडवांचा बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास संपला. संजयची आणि श्रीकृष्णाची शिष्टाई वाया गेली. शेवटी उघड उघड युध्दाचा निर्णय कायम झाला. भीष्मांना महायुध्दाचा निर्णय घ्यावा लागला. सामुहिक नाश ! परधर्मासाठी तत्कालीक हिंसा करावीच लागते. *अहिंसा परमो धर्मः* हा व्यक्तीच्या विकासाचा धर्म आहे, समष्टीचा नव्हे ! भीष्म हस्तीनापुर राज्याशी बांधील असल्यामुळे धृतराष्टाच्या बाजुने असणे भाग होते, कारण प्रचलीत धर्माचे पालन करणारे म्हणुन प्रसिध्द होते.
भीष्मांना मृत्यु आणि पराजय स्पर्श करुं शकत नसल्यामुळे पांडवांना जिंकण्यासाठी कृष्णाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. भीष्मांना कर्महेतु पहावा लागेल. श्रेष्ठहेतु आणि श्रेष्ठकर्मच विजय देऊं शकतात.
पांडव म्हणजे धर्म नव्हे ! त्यांना धर्म प्रिय आहे. विश्वधर्मासाठी नारायण पांडवांचा साधन म्हणुन उपयोग करीत आहे. एक व्यक्ती म्हणुन भीष्म सदैव स्मरणात राहिलही, पण सर्वांच्या मरणांतच विश्वधर्माचं बीज आहे. श्रीकृष्ण पांडवांना मरुं देणार नाहीत म्हणुनच ते विजयी ठरतील. कमालीच्या विश्वासानं नियमांच आणि शब्दांचं पालन भीष्मांशिवाय कोणीही करुं शकणार नाही. युध्दापुर्वी नियम ठरविण्यात येतील.
मैत्रेय ऋषींनी श्रीकृष्णाची स्तुती करत धृतराष्टाला म्हणाले, “तू कुरुंच पीठ सांभाळत आहेस ! भीष्मांसारखे लोक मनिषी असतांना पांडवांचा विरोध, निग्रह आणि अनुग्रहाने तुझ्या मुलांना आवरु शकतोस. भीमाने भयंकर किर्मिर, बकासुर राक्षसांना समाप्त केले त्या पांडवांचा तुझे पुत्र सामना करु शकेल ?”
दुर्योधनाने उपेक्षेने त्यांचेकडे पाहिल्यामुळे त्यांनी कमंडलुमधील अभिमंत्रीत जलाचे त्याचेवर शिंपन करुन कडाडले, “तुझ्या या द्वेषाने महायुध्द होईल, भीम तुझी मांडी फोडेल.”
असे म्हणुन ते भीष्मांच्या कक्षेत गेले. तीथे व्यास, भीष्म, मैत्र्येयांची चर्चा रंगली. ज्याची बुध्दी दुग्धक्षीर न्याय करुं शकते, ज्यांचा संपुर्ण वेद मुखोदगत आहे, सर्व शास्र ज्यांचे स्मरणांत आहे, जो सर्व विद्या, आधार घेतल्याशिवाय शिकवु शकतो आणि ज्याचे सर्व कलागुण ताजे आहेत असे भीष्म जीथे आहे तीथे नितिमत्ता, सदाचरण, धर्म हे असणारच ! युध्द हे संस्कृतीचे दुःखी चित्र आहे.
विराटनगरीतील सेनापती किचकाचा वध भीमाशिवाय कोणी करु शकत नाही हे निश्चित झाल्यामुळे भीष्मांसह कुरुंनी विराट नगरावर हल्ला चढवला, भयंकर युध्द झाले, पांडवांनी एकाही धार्तराष्टाला मारले नाही, पण भीष्मांसह सर्वांना जखमी मात्र केले.
जखमी भीष्मांना भेटायला त्यांचे कक्षेत गेले असतां भीष्मांनी त्यांचे समोर युध्दाचे भिषण चित्र उभे केले व युध्द थांबवण्याबद्दल सांगीतले, पांडवांना अर्धे राज्य देऊन समेट घडविण्याचे सुचवले. पण धृतराष्टाच भाग्यच पाठमोरं होतय, तीथे सुबुध्दी कुठुन सुचणार ?
भीष्मांच शरीर तापुन लालीलाल झाले. ब्रम्हा, विष्णु, महेशांची अस्रे त्यांच्यात प्रविष्ट झाल्याची जाणीव झाल्याने त्यांनी जल हाती घेऊन म्हणाले, “हे संचालका, संहारक देवा ! विश्वशांतीच्या प्रयोगात अंत न पाहता माझी आहुती, गुरुंनी दिलेल्या गुणवैभवाचं हवनांत स्विकृत करावं.”
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६
