११ पितामहः भीष्म

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! भीष्म !!! भाग -११.

पांडुराजाने दिग्विजय करुन आणलेले धन धृतराष्टाच्या सल्ल्याने भीष्म, सत्यवती व विदुर यांच्यात वाटुन टाकले. सत्यवतीने आपलं धन भीष्मांना दिले, भीष्मांनी ते आणि स्वतःजवळचं सर्व धन तिर्थयात्रिकांच्या व्यवस्थेसाठी पाठवुन देऊन या निमित्याने रिक्त होऊन साधनेत निमग्न झाले. त्यांनी जेष्ठ बंधु व्यासांची आठवण काढल्याबरोबर ते हस्तीनापुरात प्रगट झाले. भीष्म आणि व्यासांची प्रारब्ध, संचित, संकल्प माया या विषयावर दीर्घ चर्चा झाल्यावर एकाकी जीवन कंठणार्‍या भीष्मांना थोडं चैतन्य आल्यासारखे वाटले. नंतर व्यास गांधारीला भेटायला गेले असतां तीच्या इच्छेनुसार १०० पुत्रांचा आशिर्वाद दिला.

पांडुराजा कुंती, माद्रिसह शिकारीला वनात गेल्याचे कळल्यावर त्या दिव्य पुरुषाचं मुखारविंद काळं पडलं. त्यांना चिंतेने ग्रासलं. कोणाशी कांही न बोलता तडक निघुन गेले.

पांडू शिकार शोधत असतां त्यांनी मैथुनमग्न हरणांच्या युगलांची शिकार केली. पण ती हरणं नव्हती तर महायोगी किंदम ऋषी होते. त्यांचे सुख हिरावल्यामुळे संतप्त होऊन “तु जेव्हा स्रीसंग करायचे मनात आणशील त्या क्षणी काळ तुझी शिकार करेल” असा शाप देऊन गतप्राण झाले. ही गौष्ट महद्गतीने भीष्मांना कळल्यावर त्यांचे अवसानच गेलं.

काम किती प्रभावी असते याचं जिवंत उदाहरण म्हणजे पिता शंतनू, पुर्वजन्मीचे इक्ष्वाकु कुलोत्पन्न नरेश ! त्यांनी शत अश्वमेध यज्ञ करुन इंद्रलोक प्राप्त झालेले, पण वासनेनं त्यांना खाली आणलं. नंतर सत्यवतीशी विवाह, विचित्रविर्याच विषयाकर्षन, महर्षी विश्वामित्र-मेनका, त्याना झालेली मुलगी शकुंतला ! शकुंतला भरतकुलाची आदिमाया पण राजा दुष्यतांनी केलेला त्याग असे उदाहरणं भीष्मांच्या नजरेसमोरुन तरळुन गेले.

निर्विकल्प समाधीचा आनंद घेणार्‍या योग्याला ब्रम्हरंघ्रातल्या दिव्यरसामुळे भुकेवर विजय मिळवता येत असेल पण कामतृष्णेवर नाही !

पांडु शापदग्ध झालेवर कुंती माद्रीसह त्यांनी वनवास पत्करल्यामुळे धृतराष्ट्र भरतकुलाच्या सिंहासनावर बसले. अशातच गांधारी गर्भवती झाल्याचे कळल्यावर तर धृतराष्टांना गगन ठेंगणे झाले, पण त्यांचा आनंद टिकला नाही. कारण पांडुना पुत्ररत्न झाल्याचे कळल्यावर आनंदावर विरजण पडले. इकडे गांधारी कक्षात येऊन बेभान होऊन संतापाने पोटावर हाताने ताडण करु लागली. अति रक्तस्राव होऊन मांसाचा गोळा बाहेर आला. ती तो गोळा बाहेर फेकणार एवढ्यात तीथे व्यास प्रगटले. त्यांनी कमंडलुतुन अभिमंत्रीत जल हातात घेऊन सृष्टीनिर्मात्या ब्रह्माच स्मरण करीत मासाच्या गोळ्यावर शिंपडल्याबरोबर त्याचे १०० भाग झालेत. उरलेल्या मासांचा शेष भाग एकत्र करुन १०१ भाग धृताने भरलेल्या वेगवेगळ्या कुंभामधे ठेवले.

व्यासांच्या आशिर्वादाने गांधारीला १०० पुत्र व एक कन्या झाली. परंतु कुंतीपुत्र जेष्ठ असल्यामुळे सिंहासनावर त्याचाच हक्क असेल म्हणुन धृतराष्ट व गांधारी खिन्न झाले. पहिल्या कुंभातुन आलेला बालक गर्दभाच्या स्वरात ओरडु लागला. कुत्री, भेकरं भयानक आवाज करु लागले. हा अपशकुन पाहुन विदुरांनी निर्भयतेने या मुलाचा त्याग करण्याचा धृतराष्ट गांधारीला सल्ला दिला. पण त्यांचे प्रथम अपत्य असल्यामुळे पुत्रमोह आवरुं शकले नाही.

क्रमशः

संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading