७ पितामहः भीष्म

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! भीष्म !!! भाग -७.

भद्रवरास रुद्राभिषेक करुन भीष्म वराह तीर्थाला आले. त्यांचे गुरुही महान कृषक होते. त्यांनी शुर्पारक देश कृषिज्ञानाने निर्माण केला. नागवंशाची वस्ती असलेल्या कपिल वटास आले. तीथे त्यांना विविध नागांनी घेरले असतां अचल उभे असलेल्या भीष्माजवळ वृध्द नागदेव येऊन म्हणाले, “एव्हाना कोणत्याही वीरानं वैनतेयास्राचं केलं असतं, पण तुझा संयम पाहुन आणि कपिल ऋषींच्या आज्ञेन कधीही विषबाधा होणार नाही” असा वर दिला.

व्रतस्थ्य भीष्म अनेक तिर्थांना जाऊन हिमालयात कौशिकीच्या उगमस्थानावरील आश्रमात पोहोचले. दक्षिणेला भृंगुतुंग तिर्थ होते. ते स्थळ भृगुपुत्र तपस्वी ऋचिक आणि पत्नी सत्यवतीच समाधीस्थान होतं. तीचा बंधु ब्रम्हर्षि विश्वामित्र ! त्यांनीही तीथेच सभाधी घेतली होती. कौशिकीचा नातु भगवान परशुराम ! अशा ठीकाणी तिथेच थांबायचे ठरविले. स्वप्नात विश्वामित्र आले. त्यांनी भीष्माच्या मनांतील प्रश्नांना उत्तरे देत म्हटले की, “तुला पुनरपी जन्म नाही. तू जे कर्म करीत आहेस ती विसर्जीत करुन निष्कामतेचं शिक्षण मिळेल. परिणामांचा त्याग या तिर्थाद्वारे होईल.”

“कर्तव्य म्हणजे निश्चितपणे करण्याचा संकल्प ! परंपरेने राज्यकर्तव्य निश्चित केलं आहे. प्रत्येक कर्तव्याच्या स्तंभामधुन जीवनरथ पुढे हाकायचा आहे.”

पुढे ते भीष्मांना म्हणाले, “तुझ्या हातुन घडलेले तीन प्रमाद, अंबेची वाताहात, गुरुंशी युध्द कर्म, आणि त्यातुन झालेली निसर्गाची हानी हे सर्व प्रदिर्घ तिर्थयात्रेनं पापातुन मुक्त झालास. त्यामुळे हस्तीनापुरला जातांना कुरुक्षेत्रावर परशुरामांनी तयार केलेली पांच सरोवर जी रामर्‍हद म्हणुन संबोधतात त्यात स्नान करुन पितरांच तर्पन करुन पुढे गेल्यावर ललितक तिर्थ जे सम्राट कुरुंचं स्थान आहे.”

त्यानुसार त्यांनी तीथे भेट दिली. तिर्थाटन पुर्ण करुन ते हस्तीनापुरला परतले.

विचित्र विर्याची खंगलेली हालत पाहुन त्यांना फार वाईट वाटले. विचित्रविर्याने भीष्मांना याच वंशात पुनः जन्म व्हावा, आणि गुरु, पालक, मार्गदर्शक म्हणुन स्मृती बरोबर नेण्याबद्दल आशिर्वाद मागुन त्याने देह ठेवला.

विचित्रविर्याच्या देहावसनाने प्रजाजन शासंकीत झाल्यामुळे प्रजाजनाचे मानस जाणुन घेण्यासाठी, त्यांची कुरुवरची निष्ठा ढळु नये, श्रेष्ठ नृपतीची कर्तव्य पुर्णपणे आचारीत करुंचा प्रभाव अधिक दाट करीत भीष्मांनी संपुर्ण राज्यात फेरफटका मारला आणि स्थिती नियंत्रणांत आणली.

सत्यवती भीष्मकक्षात येऊन त्यांना म्हणाली की, “तुला धर्माची सुक्ष्मता, व्यापकता, वेदवेदांचे सखोल ज्ञान असल्यामुळे धर्माचा, पितृ-मातृ वंशाचा विचार करणे आवश्यक आहे. विचित्रवीर्य अचानक निपुत्रिक स्वर्गस्थ झाल्यामुळे कुलवृध्दीसाठी अंबीका, अंबालिकेला अपत्यदान द्यावं.”

त्यावर भीष्म म्हणाले, “मी प्रतिज्ञाबध्द असल्याने पृथ्वीवरील कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होईल पण प्रतिज्ञा कधीही भंग होणार नाही.” भरतकुलाची वृध्दी नियोग पध्दतीने होण्यासाठी व्यासांची नियुक्ती झाली.

क्रमशः

संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading