!!! भीष्म !!! भाग -२२.
पांचव्या दिवशी कौरवांनी मकरव्यूह आणि पांडवांनी श्येनसंज्ञक व्यूह रचला. श्येनपक्षाच्या मुखस्थानी गदाधर भीमाने मकरव्यूह फोडुन भीष्मांवर बाणांचा वर्षाव सुरु केला. नाइलाजाने भीष्मांनी वायव्यास्राचा प्रयोग करुन बहिरी ससानासारखा दिसणारा व्यूह फोडुन सात्यकीला रेटत पक्षाच्या पोटात शिरले. त्यांना आवरणं कठीण झालं. अशात ताज्या दमाचा शिखंडी जन्मजन्मांतरीची आग ओकत आलेला पाहुन भीष्मरथ बाजुला वळला. दुर्योधनाने शिताफीने द्रोणाचार्यांना शिखंडीसमोर आणलं. कोपलेल्या द्रोणाचार्यासमोरुन शिखंडीला पळण्याशिवाय पर्यायच नव्हता.
मध्यान्ह केव्हाच टळली होती ! धार्तराष्टांना यमसदनी पाठवणार्या पांडवसेनेचा समाचार घेण्यासाठी भीष्मांनी कडवं आक्रमण केलं. भीष्म आवरत नाही पाहुन कृष्णानं अर्जुनरथ भीष्मांच्या दिशेने वळवला. शरवर्षाव करीत, कौरवसेनाला मागे हटवत अर्जुन भीष्मांसमोर उभा राहिला, त्यानं एक प्रखर दिव्यास्र सोडलं. भीष्मार्जुन एकमेकांवर विविध बाणांचा वर्षाव करुं लागले. सोमदत्त आणि सात्यकीचा कोवळा मुलगा यांच्यांत चांगलीच जुंपली. सोमदत्तच्या एका लांब बाणांनी सात्यकीपुत्र आपलं मस्तक गमावुन बसला. तापलेल्या अर्जुनाने अमोध शरसंधान करुन पंचवीस सहस्र रथयोध्ये मारले. युध्दाचे भयंकर स्वरुप पाहुन भीष्मांनी युध्द थांबवण्याचे शंख फुंकले.
सहाव्या दिवशी युधीष्ठीराने मकरयुध्द तर भीष्मांनी क्रौंचव्यूह रचला. क्रौंच्याच्या मुखावर भीष्मांनी द्रोणाचार्यांची नियुक्ती केली. दोन्हीही व्यूह एकमेकांवर घात-प्रतिघात करु लागले. भीमाने अलोट पराक्रम करुनही कौरवांची सरशी झाली, मात्र दुर्योधन भीमाच्या बाणांनी विध्द झाला.
सातव्या दिवशी भीष्मांनी मंडलसंज्ञक व्यूह रचला. त्या मंडलाचे एकएक थर अद्भुत शस्र धारण केलेल्या शस्रपतींचे होते. युधीष्ठीरानं वज्रव्यूह रचला. अर्जुनाने इंद्रास्राचा वापर करुन कौरवसेना छिन्नविछिन्न केल्यामुळे भीष्मांनी निकराचं आक्रमण अर्जनावर केल. अर्जुन आवरत नाही असे पाहुन दुर्योधनाने सुशर्माला कायम अर्जुनामागे लावला. द्रोणांनी विराटपुत्र शंखला वधला. भीष्मांची शक्तीशय करणारा अर्जुन सुशर्मादी त्रिगर्तवारांमधे गुंतल्याने भीष्मांनी चौफेर शस्रफेक सुरु केली. शेवटी युधीष्ठीर भीष्मांना भिडला. घनघोर युध्द सुरु झाले. पांडवांची फजीती होत आले पाहुन युधीष्ठीराने शिखंडीला डिवचले.
शिखंडी उसळुन भीष्मांवर निघाला असतां शल्याने भीष्म-शिखंडी मधे रथ घातला. अनेक लढायांचा अनुभव असलेल्या शल्याने शिखंडीच्या त्वेषाचा धडाका देऊन शिखंडीचि त्रेधातिरपट उडवली.
भीष्म युधीष्ठीराचा धनुष्य तोड, ध्वज तोड, असं करुं लागल्यामुळे विकल होऊन युधीष्ठीर शस्र टाकुन निघुन गेले. भीम-जयद्रथाचे युध्द जुंपले, पण भीष्मपराक्रमापुढे सर्वच हतबल झाले.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६
