ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.943

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके घोंगडी  अभंग ९४३

माझिया घोंगडिया वरी ब्रह्माचा गोंडा । बाहिरी सांडा बैसावया ॥१॥
संतचरणी रुळे श्रीरंगी रंगले । व्योमाकार मिरवले तेंची देखे ॥२॥
रखुमादेविवरे विठ्ठले दिधलें । अमोलिक जालें मोलेंवीण ॥३॥

अर्थ:-
मला दिलेल्या बोधाच्या घोंगडीला ब्रह्माचा गोंडा लावलेला आहे. ही घोंगडी बाहेर नीट बसायला बाहेर घाला. त्यावर श्रीरंगात रंगलेले संतचरण रुळतील,आकाशाप्रमाणे व्यापक असलेल्या परमात्म्याच्या रंगात ते घोंगडे रंगविलेले आहे. रखुमाईचे पती श्री विठ्ठलांने हे अमोल घोंगडे मोल न घेताच दिले आहे. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *