ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.936

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके पाईक अभंग ९३६

आणिक पाईक मोलाचे तुझे । तैसें नव्हे माझें पाईकपण ॥१॥ न मगे वही मोल जीवन भातें । तें द्यावें मातें पाईकपण ॥२॥ बापरखुमादेविवरा गोसांविया । पाईकपण मी पायां जोडलेती ॥३॥

अर्थ:-

हे श्रीविठ्ठला मोल घेऊन तुझी सेवा करणारे पुष्कळ सेवक असतील. परंतु मी मात्र तसा सेवक नव्हे. मी तुझ्याजवळ इनाम मागत नाही पगार मागत नाही. किंवा निर्वाहाला सुद्धा काही मागत नाही. फक्त मला सेवकपणा द्यावा एवढेच मागणे आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठली तुमची प्राप्ती अशा पाईकपणानेच मला झाली.असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *