ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.774

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७७४

आपुलेनि भारें श्रीरंग डोलत गेलें । तंव अवचितें पाचारिलें पाठिमोरें ॥१॥ चैतन्य चोरिलें माझें चैतन्य चोरिलें । अवघे पारूषलें दीन देहें ॥२॥ ॥ बापरखुमादेविवरू दिनानाथ भेटला । विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा ॥३॥

अर्थ:-

मी आपल्या स्वरूप सौंदर्याच्या संपत्तीने श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्राप्ती करता मोठ्या आनंदाने डोलत चालले असता त्याने अवचित मला पाठीमागे बोलाविले. आणि माझे अंतःकरण त्याने चोरले. त्यामुळे हा दैन्यस्थितित असणारा देहच परका झाला. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल दिनानाथ ते भेटले. त्या योगाने माझा देहच विठ्ठलरूप झाला असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *