ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.730

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७३०

लेउनी अंजन दाविलें निधान । देखतांची मन मावळलें ॥१॥ ऐसिया सुखाचें करूनिया आळें । बीज तें निर्मळ पेरू आतां ॥२॥ ज्ञानाचा हा वाफा भरूनियां कमळीं । सतरावी निराळी तिंबतसे ॥३॥ निवृत्तिप्रसादें पावलों या सुखा । उजळलिया रेखा ज्ञानाचिया ॥४॥

अर्थ:-

श्रीगुरू निवृत्तिरायांनी माझ्या डोळ्यांत ज्ञानाचे अंजन घालून परमात्मतत्त्वरूपी निधान दाखवले. ते पाहाताच मनाचा मनपणा गेला. आणि परमानंद झाला. त्या परमानंदाचे आळे करून आता त्यांत निर्मळ बीज पेरू. हा ज्ञानाचा वाफा हृदयकमळांत भरून निरालंब आत्मस्थिति जिला सतरावी कला म्हणतात ती तुडुंब भरू.मी या सुखाला श्रीगुरू निवृत्तिरायांच्या प्रसादाने प्राप्त झालो. आणि जवळच असलेले ज्ञान उजळले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *