ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.665

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६६५

नादबिंद कळा ज्योति स्वरुपी विलया जाती । श्रुति नेति नेति म्हणती जेथें ॥१॥ नाहीं मज चाड सकळ उपाधी । एका मंगळनिधी वांचूनियां ॥२॥ श्रीरामी रमतां मनु निवडीतां नये तनु । सुखश्री सांगतां सिणु हारतु असे ॥३॥ पदापिंडा दाटणी रुपानिरुपा निरंजनीं । विठ्ठलाचरणी ज्ञानदेवो ॥४॥

अर्थ:-

नाद, विद्, कळा ज्योति ही सर्व परब्रह्माच्या ठिकाणी लय पावतात. आणि आठिकाणी श्रुतिसुद्धा नेति नेति म्हणून माघारी फिरतात. असा परममंगळ निधी श्रीविठ्ठलच आहे. त्याच्यावाचून मला कोणत्याही उपाधिची आवड नाही. श्रीरामाच्या ठिकाणी रमलो असतां शरीर किंवा मन याची निवड करता येत नाही. जे दोन्ही एकरुपच होतात. त्या श्रीरामाच्या सुखाचा अनुवाद करीत असता सर्व साराच्या दुःखाचा शीणभाग नाहीसा होऊन जातो. निरुप जे निरंजन पद त्याच्या ठिकाणी शरीराची किवा नामरुपाची आटणी होऊन श्रीविठ्ठलाचे चरणी मी रममाण झालो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *