ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.654

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६५४

ज्योतीस ज्योति मेळउनीं हातीं । तंव अवचित्तीं झोंबिन्नली ॥१॥ अद्वैत पाहतां न दिसे गुणमेळु । गुणा गुणीं अडळु ठाउका नोहे ॥२॥ शून्याहि परता आदि अंतु नाहीं । तो असोनियां देहीं धांवो सरे ॥३॥ बापरखुमादेविवरू विसरला धांव । हरिरूप भाव दीपकळा ॥४॥

अर्थ:-

जीवात्मज्योतीचे परमात्म ज्योतीशी सहजच जीवपरमात्म्याचे ऐक्य होते. अशा अद्वैतसृष्टीचा उदय झाला असतां मायेच्या त्रिगुणांत गुणागुणी भाव ठाऊक नसल्यासारखा होतो. शून्याही पलिकडचा आदि अंतरहित तो परमात्मा असून देहामध्येच व्याप्त असल्यासारखा दिसतो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते हालचालरहित असे एकरूप आहते. ही ज्ञानाची ज्योत श्रीगुरू निवृत्तिरायानी आम्हाला दाखवली असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *