ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.436

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४३६

तुर्येमध्ये माझा अखंड रहिवास । निवृत्ति का अविनाश तुर्या करी ॥१॥ स्थूळदेह निमतां सूक्ष्म उरता । कारणी हारपतां कैसें झालें ॥२॥ ज्ञानदेव म्हणे महाकारणीं नांदे । निवृत्तीने आनंदे दाखविले तें ॥३॥

अर्थ:-

माझा अखंड रहिवास तुर्येच्या अवस्थेत असतो. निवृत्तीनाथही म्हणतात की या तूर्येत मनुष्य अविनाशरूप होतो. याकरिता लय चिंतनाने स्थूल, सूक्ष्म व कारण या तीन्ही देहांचा महाकारण देहात लय पावतो. ही जी चौथी अवस्था तिला तुर्या अवस्था म्हणतात. या अवस्थेनंतर मनुष्य अविनाश पदाला प्राप्त होतो. व त्या अविनाश पदाचे ज्ञान निवृत्तीनाथांनी आनंदाने मला करून दिले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *