ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.435

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४३५

आत्माराम नयनीं निरखुनी देखिला । निळा रंग ओतिला आदि अंती ॥१॥ गोल्हाट त्रिकुट ब्रह्मरंध्री वस्तु । तुर्येची ऐसी मातु याच ज्ञानें ॥२॥ ज्ञानदेव म्हणे सर्वांतरी तूर्या । निवृत्ति योगी वेगी गुज बोले ॥३॥

अर्थ:-

डोळ्यात चांगले निरखुन पाहिले. म्हणजे ते निळ्या रंगाचे आत्मस्वरूप आरंभापासून शेवटपर्यंत सर्वत्र भरलेले आहे. असे डोळ्याने दिसते. त्या आत्मज्ञानाने त्रिकुट गोल्हाट वगैरे चारही महाकारण स्थाने याच ज्ञानाने जाणली जातात. मला योगीराज श्रीगुरू निवृत्तिरायांनी हे तुर्या अवस्थचे गुह्य ज्ञान सांगितले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading