ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.345

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३४५

चहुं शून्याचा भेद कैसा पहावा देहीं । ब्रह्मरंध्री नि:संदेहीं निजवस्तू ॥ सांवळे सकुमार बिंदुचे अंतरी । अर्धमात्रे वरी विस्तारलें ॥ त्रिकुट श्रीहाट गोल्हाट तिसरें । औठपीठादि सारे ब्रह्मांडासी ॥ स्थूल सूक्ष्म कारणी माया । महाकारणाच्या ठायां रीघ करा ॥ निवृत्ति ज्ञानदेव उभयतांचे बोल । आकाश बुबुळीं पाहा असे ॥

अर्थ:-
या देहातच असून चारी अवस्थांचा खोटेपणा कसा ओळखावा? ब्रह्मरंधात ती ब्रह्मवस्तु कशी पाहावी. ब्रह्मरंधातील त्या सूक्ष्म बिंदूतील अर्थमात्रेत ती सांवळी सुकुमार मूर्ति आहे त्रिकूट, श्रीहाट, गोल्हाट व औटपीठ ही महाकारणातील स्थाने आहेत योगाभ्यासाने स्थूल, सूक्ष्म व कारण या मायिक देहांचा निरास करून महाकारणात प्रवेश करता येतो. माझे व निवृत्तिरायांचे शब्दही वरिल अर्थाचेच आहेत. हे विचार करून पहा असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *