ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 505

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५०५

पुण्याशी जोडितां पापचि जोडिजे । तेंणेंचि पाविजे अधोगती ॥१॥ सोमयाग श्रेष्ठ करितां पावन । करावें हनन पशु तेथें ॥२॥ तेचि ते या दोष तयालागी जन्म । भोगिजेती कर्म पशु योनी ॥३॥ पुण्य तेथें पाप समचि वर्तती । रात्रंदिन आथी जियेपरी ॥४॥ पापपुण्य दोन्ही त्यागुनी निराळा । जाहला स्वलीला ज्ञानदेव ॥५॥

अर्थ:-

पुण्य संपादन करण्याकरिता यज्ञादिक करून तेथे पशु बळी दिल्यामुळे पाप होते. व त्या पापामुळे अधोगतीला जावे लागते. सर्वश्रेष्ठ सोमयाग करून मनुष्य पावन होतो. पण तो करण्याकरिता पशु मारावा लागतो. व त्यामुळे कर्त्याला दोष लागून त्या पापांच्या भोगा करिता पुढे पशुजन्म घ्यावा लागतो. म्हणून जसी रात्र आणि दिवस ही एकामागून एक सारखी आहेत. त्याप्रमाणे पुण्याबरोबर पापही असतेच. आम्ही पुण्य व पाप सोडून सहज स्वस्वरूपी मौजेने राहिलो आहोत.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *