ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.359

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३५९

औट पीठ डोंगरी गाय एक वसे । क्षीर सेवितुसे निजयोगी ॥१॥ धाले पर्वपदीं समान लक्षिती । क्षुधा चाड चित्ती नाहीं नाहीं ॥२॥ भ्रुवातंरी लक्ष लाऊनी बैसा ध्यानी । ऐक्यासी उन्मनी होऊनी राहा ॥३॥ ज्ञानदेव नमितो आदी देवी प्रती । नेत्रीं पाहे ज्योति शुद्धरूप ॥४॥

अर्थ:-

योग्याभ्यासातील अग्नीचक्ररूप डोंगर त्यावर चित्तरूप गाय बसते. व गायीचे स्थिरतारूप दूध योगी सेवन करतो. त्या दूधाने तृप्त झाल्यामुळे भुक लागत नाही. दोन्ही भुवयांच्या मध्ये असलेल्या अग्नीचक्राचे ठिकाणी चित्त ठेऊन ध्येयरूप झाल्यामुळे सहजच उन्मनी दशा प्राप्त होते.आदि देवता जे ब्रह्म स्वरूप त्यास मी वंदन करतो व तीच शुध्द ज्योती डोळ्यात दिसते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *