संत तुकाराम म. चरित्र ११

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

तुकाराम भाग-११

पलिशेटी नावाच्या इसमाने आपल्या मिरासीच्या शेतांपैकी शिवगंगेचा तुकडा मंबाजी नांवाच्या ब्राम्हणास देऊन मठ बांधुन दिला. तीथे मंबाजी राहुन लोकांना मंत्र, गुरुपदेश करत असल्यामुळे शिष्य संख्या वाढली. परंतु तुकोबांच्या मार्गाचा प्रसार झाल्याने लोक मंबाजीला सोडुन तुकोबांच्या भजनी लागल्याने त्यांचा द्वेष करुं लागला. एके दिवशी मंबाजीच्या मठातील बागेची एका म्हशीने बरीच नासधुस केली.

दुसर्‍या दिवशी एकादशी. दर्शनाला येणार्‍या लोकांना काट्यांचा उपसर्ग होऊ नये म्हणुन तुकोबांनी ती वाट निष्कटंक केली. हे पाहुन मंबाजीच्या अंगाचा भडका उडाला. त्याने एका काटेरी काडी घेऊन तुकोबाला झोडपु लागला. दहा काठ्या त्यांच्या पाठीवर मोडल्या. तुकोबा देवाचे ध्यान व तोंडाने हरीनामस्मरण करत मुकाट्याने मार खात होते. शेवटी मंबाजी थकला पण तुकोबाची शांती ढळली नाही. मंबाजीकडुन त्यांना अनेक प्रकारे उपसर्ग होत होता.

पुढे त्यांची योग्यता सर्वांना कळुन आली. रामेश्वर भट्ट सारखे त्यांचे शिष्य बनले. खुद्द शिवाजी महाराज जीव धोक्यात घालुन त्यांचे किर्तन श्रवण करण्यांस येत असे. एकदा शिवाजी महाराजांनी तुकोबांना दिवट्या, छत्री, घोडे पाठवुन त्यांना बोलावले, पण ते गेले नाहीत. तुकोबांच्या हयातीतच त्यांचे अभंग जयराम स्वामीसारखे संत आपल्या किर्तनात म्हणु लागले.

हा त्यांचा मानमरातब काय कमी होता ? तुकाराम महाराजांच्या काळी महाराष्ट सर्व बाजुंनी अवनतीच्या खड्यात पंगु होऊन दीन बनला होता. अशावेळी त्यांनी भागवत धर्माची दारे सताड उघडुन सर्व जनतेस स्थीर व धार्मिक ऐक्य उत्पन्न करुन कार्यप्रवृत्त केले.

तुकोबांनी विठ्ठल हाच गुरु मानला. त्यांचे युध्दाचे शस्र दया, क्षमा, शांती, प्रेम, नम्रता, आत्मपरिक्षण आणि परमेश्वर नामाचे स्मरण ही शस्रे वापरुन रात्रंदिवस घनघोर युध्द करुन शत्रुंना जिंकले. शत्रुला पादाक्रांत करुन इश्वराला वश केले.

उपदेश कोणाकडुनही घेतला नाही. विचारशक्ती आपली असावी, गुरुचा गुलाम होऊ नये, गुरु जर परमेश्वर प्राप्तीच्या आड येत असेल तर त्याला बाजुला सारावे अशी तुकोबांची शिकवण होती. गुरुंच्या नादी न लागता जो जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, आकाशी ह्रदयात आहे अशा एका देवाची कास धरावी. तुकोबांचे परमगुरु राघव चैत्यन्य, ज्यांचे पुर्वाश्रमीचे नांव राघव होते.

तुकोबांच्या काळी गुणी माणसांचे पीक होते. त्यांच्या  संपर्काने कांही माणसे संत झालीत, त्यातील मुख्य तीन संत- रामेश्वर भट,ज्याने सुरुवातीला तुकोबांना छळले, वह्या डोहात बुडवल्या, २- कचेश्वर ब्रम्हे, आणि तिसरी बहिणाबाई. रामेश्वर भटाने तुकोबांना छळल्यामुळे अंगाचा दाह होऊ लागला तेव्हा त्याला पश्चाताप होऊन डोळे उघडले, तुकोबांची योग्यता कळली,

त्यामुळे त्यांना शरण जाऊन त्याच्या ठायी असलेला ज्ञातीचा व वर्णाचा अभिमान नष्ट होऊन  तुकोबांचे शिष्यत्व पत्करले. कचेश्वर ब्रम्हेचा जन्म वैदिक कुळात झाला. तुकोबांच्या अनुग्रहाने तो किर्तन करु लागला. पुढे त्यांचा तो मोठा भक्त झाला. बहिणाबाई अकरा वर्षाची असतांना जयरामस्वामींच्या  किर्तनांत  तुकोबांचे वेदांत्यपर अभंग ऐकुन त्यांच्या दर्शनाचा ध्यास लागला असतां, तुकोबांनी तीला स्वप्नात दर्शन देऊन उपदेश केला.

क्रमशः

संकलन-मिनाक्षी देशमुख

संत तुकाराम महाराज संपूर्ण चरित्र

संत तुकाराम महाराज संपूर्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *